• Sun. Jun 21st, 2026

    छत्रपती शिवाजी महाराज यांना विधान भवनात अभिवादन

    ByMH LIVE NEWS

    Feb 19, 2023
    छत्रपती शिवाजी महाराज यांना विधान भवनात अभिवादन

    मुंबई, दि.१९ : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज विधान भवनातील त्यांच्या सिंहासनाधिष्ठीत पुतळ्यास महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. सकाळपासूनच विधान भवनाचा परिसर तुतारी-सनई-चौघड्याच्या निनादाने दुमदुमून गेला होता. पारंपरिक वेषातील तुतारीवादक हे या शिवजयंती सोहळयाचे वैशिष्टय ठरले.

    याप्रसंगी विधानसभा अध्यक्षांचे सचिव महेंद्र काज, वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्राचे संचालक आणि जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

    ०००

     

    Pawanraje Nimbalkar : पवनराजे निंबाळकर प्रकरण; सख्खे चुलत भाऊ, पाटलांच्या मार्गदर्शनाखाली निंबाळकरांचं राजकारण फुललं, पण पाटलांना कुणी संपवलं? पाटील-निंबाळकर कुटुंबाचा राजकीय वाद A टू Z
    Ashadhi Ekadashi Yatra : वारकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! आषाढी यात्रेसाठी ५,५०० एसटी बसेस, गावापासून थेट विठ्ठलाच्या पंढरीमध्ये जाता येणार
    Onion Price: कांद्यासाठी 1730 रुपये किमान हमीभाव जाहीर; नवीन दर शनिवारपासून तातडीने लागू

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed