• Mon. Sep 14th, 2026

वेंगुर्ला शहर नळ पाणीपुरवठा योजनेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण

ByMH LIVE NEWS

Feb 16, 2023
वेंगुर्ला शहर नळ पाणीपुरवठा योजनेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण

सिंधुदुर्गनगरी दि. १६ :- वेंगुर्ला शहर नळ पाणीपुरवठा योजना टप्पा क्रमांक २, निशाण धरणाची उंची २.५ मीटरने वाढविणे आणि वेंगुर्ला नवाबाग बीच येथील जलबांदेश्वर मंदिर जवळ बांधण्यात आलेल्या झुलत्या पुलाचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज करण्यात आले. यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर, पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल, अधीक्षक अभियंता छाया नाईक, कार्यकारी अभियंता अनामिका जाधव, उपविभागीय अभियंता संजय दहिफळे आदी उपस्थित होते.

माझा वेंगुर्ला पतंग महोत्सवाचे उद्घाटनही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

०००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed