• Mon. Nov 25th, 2024

    महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सहायक कक्ष अधिकारी पदाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी, तात्पुरती निवड यादी प्रसिद्ध

    ByMH LIVE NEWS

    Jan 24, 2023
    महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सहायक कक्ष अधिकारी पदाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी, तात्पुरती निवड यादी प्रसिद्ध

    मुंबई, दि.२४ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा – २०२२ मधील उमेदवारांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी व तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्याआधारे उमेदवारांकडून भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्याचे (Opting Out) विकल्प मागविण्यात आले आहेत.

    परिक्षेच्या भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा (Opting Out) विकल्प सादर करण्याकरिता आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावरील ‘ONLINE FACILITIES’ या मेनूमध्ये ‘Post Preference / Opting Out’ वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात आली आहे. ही वेबलिंक दि. २५ जानेवारी, २०२३ रोजी १२.०० वाजेपासून दि. ३१ जानेवारी, २०२३ रोजी २३.५९ वाजेपर्यंत सुरु राहणार आहे.

    ऑनलाईन पद्धतीखेरीज अन्य कोणत्याही प्रकारे पाठविलेला भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा पर्याय ग्राह्य धरला जाणार नाही. तसेच याबाबत उमेदवारांची कोणतीही बाब / निवेदने / पत्रव्यवहार तद्नंतर विचारात घेतली जाणार नाही.

    भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याच्या (Opting Out) विकल्पाआधारे अंतिम निकाल / शिफारशीसंदर्भात कार्यवाही करण्यात येईल. तसेच भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा विकल्प निवडणाऱ्या उमेदवारांचा अंतिम निकाल प्रक्रियेत समावेश करण्यात येणार नाही. विकल्प सादर करण्यास कोणत्याही प्रकारची तांत्रिक अडचण उद्भवल्यास आयोगाच्या १८००- १२३४-२७५ किंवा ७३०३८२१८२२ या टोल फ्री क्रमांकावर अथवा Support – [email protected] या ई-मेल पत्त्यावर विहित कालावधीत संपर्क साधता येईल, असे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने कळविले आहे.

    00000000

    राजू धोत्रे/विसंअ

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *