• Mon. Nov 25th, 2024

    रुग्णांसाठी डॉ. तात्याराव लहाने देवच – पालकमंत्री संजय राठोड

    ByMH LIVE NEWS

    Nov 30, 2022
    रुग्णांसाठी डॉ. तात्याराव लहाने देवच – पालकमंत्री संजय राठोड

    पालकमंत्र्यांचा शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांशी संवाद 

    मोतिबिंदु शस्त्रक्रिया शिबिरात तिनशे रुग्ग्णांची शस्त्रक्रिया

    यवतमाळ दि, ३० नोव्हेंबर, जिमाका:-  अनेक प्रतिष्ठित व्यक्ती  पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने यांना भेटण्यासाठी, त्यांच्याकडुन उपचार करुन घेण्यासाठी तासंतास रांगेत उभे असतात.  त्यांच्या व्यस्त वेळापत्रकातुन वेळ काढून  आपल्या जिल्ह्यातिल नागरिकांच्या डोळ्यांची मोतिबिंदू शस्त्रक्रिया करण्यासाठी डॉ. लहाने आपल्या जिल्ह्यात आलेत. आपण कुणीही देव पाहिला नाही, मात्र तात्याराव लहाने आणि रागिणी पारेख यांच्या रुपात आज देव पहायला मिळाला, असे उद्गार अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी काढले.

    स्व. वसंतराव नाईक वैद्यकिय महविद्यालयात मोतिबिंदु शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले होते. शस्त्रक्रिया झालेल्या  रुणांशी संवाद साधतांना ते बोलत होते. यावेळी डॉ. तात्याराव लहाने, डॉ रागिणी पारेख,  डॉ. सुरेंद्र भुयार व त्यांची चमू तसेच अधिष्ठाता मिलिंद फुल पाटिल उपस्थित होते.

    पुढे बोलताना श्री राठोड म्हणाले, डॉ. तात्याराव लहाने यांच्या हातात जादु आहे. त्यांनी आतापर्यंत लाखो शस्त्रक्रिया करुन रुग्णांना नवी दृष्टी दिली आहे. मागिल वर्षी सुद्धा आपल्या जिल्ह्यात १ हजार शश्त्रक्रिया त्यांनी केल्या होत्या. यावर्षी शिबिरासाठी पाठपुरावा करुन त्यांना आमंत्रित केले. त्यांच्या सारख्या निष्णात डॉक्टरांकडुन आपल्याला सेवा मिळत आहे, ही आपल्यासाठी अभिमानाची आणि भाग्याची बाब आहे.

    डोळे हा अतिशय नाजुक भाग आहे. त्यामुळे शस्त्रक्रिया केलेल्या सर्व रुग्ग्णांनी डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे डोळ्यांची काळजी घ्यावी. डिसेंबर महिन्यात सर्व आजारांसाठी तपासणी शिबिर आयोजित करणार आहे. नागरिकांनी त्याचाही लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री संजय राठोड यांनी यावेळी केले. त्यांनी रुग्णांची आस्थेने विचारपुस करुन वेळेवर औषध घेण्यासही सांगितले.

    यावेळी डॉ. तात्याराव लहाने यांनी शस्त्रक्रियेनंतर  रुग्णांनी डोळ्याची निगा कशी राखावी याबाबत मार्गदर्शन केले.

                 ०००

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *