• Fri. Nov 15th, 2024

    स्व.भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेसाठी १०४ कोटी ५० लाखांच्या निधीस प्रशासकीय मान्यता – फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे

    ByMH LIVE NEWS

    Oct 12, 2022
    स्व.भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेसाठी १०४ कोटी ५० लाखांच्या निधीस प्रशासकीय मान्यता – फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे

    मुंबई दि. १२ : राज्यात स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेच्या सन २०२२ – २०२३ मध्ये अंमलबजावणीसाठी अर्थसंकल्पित केलेल्या एकूण रु. १०४ कोटी ५० लाख रुपये निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता देण्यात आल्याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आल्याचे रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांनी सांगितले.

    मंत्री श्री. भुमरे म्हणाले, ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जे शेतकरी फळबाग लागवडीकरिता पात्र ठरु शकत नाहीत अशा शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने ‘स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना’ सुरु केली आहे. सन २०२२ -२०२३ च्या प्रथम नऊमाहीकरीता (डिसेंबर २०२२ अखेर आवश्यक असणारा अनिवार्य व कार्यक्रमांतर्गत खर्चाचा अर्थसंकल्प‍ित निधी एकूण वार्षिक तरतूदीच्या ६० टक्केच्या मर्यादेत वितरित केला जाईल’.

    सर्वसाधारण प्रवर्गासाठी १०० कोटीअनुसूचित जाती प्रवर्गासाठी ४ कोटी आणि अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी ५० लाख असे एकूण १०४ कोटी ५० लाख निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता देण्यात आली असल्याचे श्री. भुमरे यांनी यावेळी सांगितले.

    000

    राजू धोत्रे/विसंअ/12.10.22

     

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed