• Wed. Sep 16th, 2026

Latur Sanjeev Sonawane Death Case : लातूर शहरातील चंद्रभानू सोनवणे महाविद्यालयाचे 65 वर्षीय संस्थाचालक संजय चंद्रभानू सोनवणे यांनी राहत्या घरी परवानाधारक पिस्तूलमधून डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना 14 ते 15 सप्टेंबरच्या मध्यरात्री घडली. आत्महत्या केली त्यावेळी सोनवणे हे घरी एकटेच होते.

बहिणीमुळे संजीव सोनवणेंच्या मृत्यूचा उलगडा(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
ऋषिकेश होळीकर, लातूर : डॉ. चंद्रभानू सोनवणे कनिष्ठ महाविद्यालयाचे संस्थापक संजीव चंद्रभानू सोनवणे (वय 65) यांनी शहरातील पद्मानगर येथील स्वतःच्या घरात डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना काल मंगळवारी सकाळी उघडकीस आली.

सोनवणे बेडवर रक्ताच्या थारोळ्यात

संजीव सोनवणे शहरातील पद्मानगर परिसरातील त्यांच्या मोठ्या बंगल्यात एकटेच राहत होते. त्यांची पत्नी सुचेता, मुलगा दिग्विजय, मुलगी क्षमा आणि जावई हे सर्व अमेरिकेत वास्तव्यास आहेत. 14 सप्टेंबर सोमवारी रोजी रात्री ते घरी एकटेच होते. दुसऱ्या दिवशी बहीण त्यांना भेटायला आली असता घराचे गेट उघडल्यानंतर बहिणीने त्यांना आवाज दिला. प्रतिसाद न मिळाल्यानं त्या दुसऱ्या मजल्यावरील त्यांच्या बेडरूममध्ये गेल्या. तेथे सोनवणे बेडवर रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. घटनास्थळी त्यांचे परवानाधारक शस्त्र आणि सुसाईड नोटही सापडली. त्यानंतर या धक्कादायक घटनेची माहिती अमेरिकेतील त्यांच्या कुटुंबीयांना देण्यात आली आहे.

Maharashtra TimesNashik Accident : पहिल्यांदाच गणपती बसवण्याचा उत्साह, पण आनंदावर विरजण, बाप्पाच्या आगमनावेळी कृष्णाचा अपघाती मृत्यू; जिवाभावाचा मित्र गेल्यानं सर्वच ढसाढसा रडले

दोन दिवसांनंतर अंत्यसंस्कार

सोनवणे यांना एक मुलगी आणि एक मुलगा आहे. पत्नी, जावई सध्या अमेरिकेत आहेत. भाऊ मुंबईत तर तीन बहिणी पुण्यात वास्तव्यास आहेत. कुटुंबीय पोहोचण्यासाठी दोन दिवस लागतील. त्यामुळे अंत्यविधी उद्या गुरुवारी ठेवण्यात आला आहे. ‘माझ्या कुटुंबातील कुणालाही यासाठी जबाबदार धरू नये. तसेच त्यांना त्रास देऊ नये,’ अशा आशयाचा मजकूर सुसाईड नोटमध्ये असल्याचं पोलिसांनी सांगितलं. नोटमध्ये नमूद असलेलं ‘स्वीट फूल’ हे शब्द महत्त्वाचा केंद्रबिंदू आहे.

हस्ताक्षराची पडताळणी सुरू

नातेवाइ‌कांनी सुसाइड नोटमधील हस्ताक्षर सोनवणे यांचेच असल्याचे सांगितले आहे. तरीही पोलिसांनी त्यावर अंतिम शिक्कामोर्तब केलेले नाही. हस्ताक्षराची खात्री करण्यासाठी हस्ताक्षर नमुन्यांच्या आधारे पडताळणी केली जात आहे. मूळचे औसा तालुक्यातील मोगरगा येथील रहिवासी असलेले संजीव सोनवणे यांचे वडील डॉ. चंद्रभानू सोनवणे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील हिंदी विभागप्रमुख होते. त्यांच्या नावानेच त्यांनी लातूर शहरात कनिष्ठ महाविद्यालय स्थापन करण्यात आले होते. त्यांनी धाराशिव तालुक्यातील उक्कडगाव येथे मोठे महाविद्यालय स्थापन केले.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा