शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीत एकनाथ शिंदे यांचे वकील नीरज किशन कौल यांनी युक्तिवाद केला. या युक्तिवादावेळी नीरज किशन कौल यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर एकाधिकारशाहीचे आरोप केले. तसेच राजकीय पक्षात फूड पडली नाही, असा युक्तिवाद कौल यांनी केला. यावेळी पक्षाच्या घटनेत लोकशाही व्यवस्था असावी, असे मुद्दे कौल यांनी मांडले. यावेळी त्यांनी पक्ष घटनेतील लोकशाहीवर भाष्य करताना अर्जुन सिंग केसचा दाखला दिला. त्यामुळे शिवसेनेच्या सुनावणीत आता मोठा ट्विस्ट आला आहे.
नवी दिल्ली / मुंबई : शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणावर मंगळवारी (15 सप्टेंबर) सुप्रीम कोर्टात पुन्हा सुनावणी पार पडली. सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वकील नीरज किशन कौल यांनी आज युक्तिवाद केला. शिवसेना उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वकिलांचा युक्तिवाद पूर्ण झाला आहे. यानंतर एकनाथ शिंदे यांचे वकील युक्तिवाद करत आहेत. शिंदेंचे वकील नीरज किशन कौल यांनी आजच्या सुनावणीत काही महत्त्वाचे दावे आणि आरोप केले आहेत.
नीरज किशन कौल यांचा युक्तिवाद काय?
मागच्या सुनावणीवेळी मी 1999च्या घटनेबद्दल माहिती दिली होती. शिवसेना प्रमुखाची नेमणूक ही प्रतिनिधी सभेच्या बैठकीनंतर होते, असा युक्तिवाद नीरज किशन कौल यांनी केला. यावेळी शिवसेनेच्या घटनेत नेमकं काय लिहिलं आहे याबाबत कौल यांनी कोर्टाला सांगितलं.
कौल यांचा पक्षप्रमुखपदाबाबत मोठा युक्तिवाद
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधननंतर 2013 ला पक्षप्रमुख पद गोठवलं होतं. पक्षप्रमुखपद 2018 च्या घटनेनुसार चुकीचं आहे. ते पक्षाच्या घटनेला धरुन नव्हतं. पक्षप्रमुखपद 2018 मध्ये आलं हा त्यांचा युक्तिवाद चुकीचा आहे, असा मोठा युक्तिवाद नीरज किशन कौल यांनी केला. शिवसेना प्रमुखपद 2013 मध्ये गोठवलं तेव्हाच पक्षप्रमुखपद निर्माण झालं होतं. त्यामुळे पक्षप्रमुखपद 2018 ला आले हा त्यांचा यु्क्तिवाद चुकीचा आहे, असा युक्तिवाद कौल यांनी केला.
एकनाथ शिंदेंनी आपलाच पक्ष खरा शिवसेना असा युक्तिवाद का केला?
शिवसेनेच्या विचारांच्या विरोधात असलेल्या पक्षाशी युती करण्याचा निर्णय उद्धव ठाकरेंनी घेतला होता. त्यामुळे पक्षात एकप्रकारे असंतोष निर्माण झाला होता. त्याआधारेच एकनाथ शिंदे यांनी आपलाच पक्ष मूळ शिवसेना असल्याचा दावा केला, असा युक्तिवाद कौल यांनी केला.
राजकीय पक्ष कोणता आहे हे ठरवताना विधीमंडळातील आमदारांची संख्या पाहणं गरजेचं आहे, असं याआधी सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे. त्यामुळे शिवसेनेच्या प्रकरणात विधीमंडळातील आमदारांची संख्या निवडणूक आयोगाने लक्षात घेतली, असा युक्तिवाद शिंदेंचे वकील नीरज किशन कौल यांनी केला.
पक्षातील बदल निवडणूक आयोगाला सांगितले नसल्याचा दावा
पक्षाची नवी घटना निवडणूक आयोगात सादर केलेली नाही. पक्षाचं स्ट्रक्चर, नवीन प्रतिनिधीची माहिती आयोगात दिलेली नाही. 2018 मध्ये पक्षाच्या घटनेत जे बदल करण्यात आले होते त्याची माहिती निवडणूक आयोगात दिली गेली नव्हती, असा मोठा युक्तिवाद कौल यांनी केला.
ठाकरेंवर गंभीर आरोप
उद्धव ठाकरे यांनी पक्षातील लोकशाही संपवून सर्व अधिकार स्वत:कडे घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पक्षात असंतोष निर्माण झाला, असा युक्तिवाद कौल यांनी केला. बाळासाहेब ठाकरे यांनी निवडणूक आयोगाचे अधिकार मान्य केले होते. 1999 सालची घटना निवडणूक आयोगासमोर आणल्यानंतर निवडणूक आयोगाने त्यामध्ये काही बदल सूचवले होते. ते बाळासाहेब ठाकरे यांनी मान्य केले होते. 2018 साली उद्धव ठाकरे यांनी त्या घटनेत बदल केला जो अवैध होता, असा आरोप कौल यांनी आपल्या युक्तिवादात केला.
‘पक्ष देताना 3 गोष्टी बघितल्या जातात’, कौल यांचा युक्तिवाद
संवंधिनात लोकनियु्क्त आणि लोकशाही व्यवस्था असावी, असं सांगण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला आहे. पक्ष देताना 3 गोष्टी पाहिल्या जातात. पक्षाची घटना, ऑर्गनायझेशन स्ट्रक्टर, विधीमंडळ संख्या पाहतात. कलम 324 अंतर्गत निवडणूक आयोगाला व्यापक आणि पूर्ण अधिकार आहेत. त्यामुळेच त्यांनी 2018 ची घटना योग्य नव्हती, असा निर्णय दिला. पण आयोगाने घेतलेल्या निर्णयावरुन आयोगाने अभूतपूर्व केल्याचा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय, असा युक्तिवाद कौल यांनी केला.
‘विधीमंडळ फुटीपलीकडे जाऊन विचार करणं आवश्यक’
“चिन्हांच्या आदेशानुसार मूळ राजकीय पक्ष कोणता आहे हे ठरवणं आवश्यक आहे. राजकीय पक्षात कोणतीही फूट पडलेली नाही”, असा युक्तिवाद कौल यांनी केला. “निवडणूक आयोगाकडे जाण्यापूर्वी आम्ही ठराव मंजूर केले आहेत. विधीमंडळ पक्षात फूट पडल्याने निवडणूक आयोगाकडे गेलो हे म्हणणं चुकीचं आहे. आमचं म्हणणं तसं कधीच नव्हतं. विधीमंडळ पक्षातील फुटीपलीकडे जाऊन सर्वांचा विचार करणं गरजेचं आहे. या सर्वांचे पडसाद राजकीय पक्षापर्यंत पोहोचू शकतात. संपूर्ण राजकीय पक्षाचा विचार केला पाहिजे. आमचं तेच म्हणणं आहे”, असा मोठा युक्तिवाद कौल यांनी केला.
“पक्षात दोन गट तयार झाले कारण निवडणुकीपूर्वी असलेली युती तोडली. निवडणुकीआधीची वैचारिक युती बदलून निवडणुकीनंतर दुसऱ्या पक्षासोबत सरकार स्थापन केलं गेलं. पक्षाच्या मुल्यांविरोधात असणाऱ्यांसोबत सत्ता स्थापन केली गेली. भ्रष्ट पक्षांसोबतच्या युतीमुळे कार्यकर्त्यांना अपमानजनक प्रश्नांना सामोरं जावं लागत होतं”, असा युक्तिवाद नीरज किशन कौल यांनी केला.
कौल यांच्याकडून अर्जुन सिंग केसचा दाखला
अर्जुन सिंग केसमध्ये पक्षांतर्गत लोकशाहीचा मुद्दा मांडला आहे.पक्षात पक्षांतर्गत लोकशाही असणं गरजेचं आहे, असा महत्त्वाचा मुद्दा नीरज किशन कौल यांनी आपल्या युक्तिवादात मांडला. यानंतर आजची सुनावणी संपली. आता पुढची सुनावणी उद्या बुधवारी (16 सप्टेंबर) होणार असल्याचं जाहीर करण्यात आलं.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा