• Tue. Sep 15th, 2026

Nagpur Vishwas Nangre Patil Hichki Bar and Restaurant Raid : सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील न्यू कॉलनी परिसरात पार्क एव्हेन्यू इमारतीच्या 13व्या मजल्यावर ‘हिचकी बार अँड रेस्टॉरंट’ सुरू आहे. येथे शासनाने निश्चित केलेल्या मर्यादेपेक्षा मोठ्या आवाजात डीजे वाजविला जात असल्याची माहिती पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांना मिळाली.

विश्वास नांगरे पाटील हिचकी बार अँड रेस्टाँरंट छापा(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
जितेंद्र खापरे, नागपूर : नागपूर पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी नागपूर शहरात डीजे, डॉल्बी सिस्टम आणि कर्णकर्कश आवाजावर निर्बंध लावल्यानंतर पोलिसांनी नियम मोडणाऱ्यांविरोधात कारवाई अधिक तीव्र केली आहे. नागपूर शहरातील बार, पब, कॅफे आणि रेस्टॉरंटमध्ये निर्धारित ध्वनिमर्यादेचे उल्लंघन करून डीजे वाजविणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर आहे. याच मोहिमेअंतर्गत सदर येथील ‘हिचकी बार अँड रेस्टॉरंट’वर एस्कॉर्ट पथकाने मध्यरात्री छापा टाकला. यावेळी डीजेचा आवाज तब्बल 100.6 डेसिबल इतका असल्याचे ध्वनितीव्रता मोजणीतून समोर आलं.

‘हिचकी बार अँड रेस्टॉरंट’

सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील न्यू कॉलनी परिसरात पार्क एव्हेन्यू इमारतीच्या 13व्या मजल्यावर’हिचकी बार अँड रेस्टॉरंट’ सुरू आहे. येथे शासनाने निश्चित केलेल्या मर्यादेपेक्षा मोठ्या आवाजात डीजे वाजविला जात असल्याची माहिती पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांना मिळाली. डीजेवरील निर्बंधांची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने त्यांनी एस्कॉर्ट पथकाला तातडीने घटनास्थळी जाऊन पाहणी करण्याचे निर्देश दिले.

Maharashtra TimesLatur Crime : सुप्रसिद्ध शिक्षण संस्थाचालक संजीव सोनवणे प्रकरण; लातूरमध्ये राहत्या घरी स्वत:ला संपवलं, मित्रपरिवाराने सांगितलं खरं कारण

तब्बल 100.6 डेसिबल आवाजाची नोंद

पोलीस आयुक्तांच्या आदेशानंतर एस्कॉर्ट पथकाचे एपीआय भगवान कोली हे पथकासह पार्क एव्हेन्यू इमारतीत पोहोचले. पंचांच्या उपस्थितीत ध्वनितीव्रता तपासण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. सुरुवातीला इमारतीच्या बाहेरील भागात ध्वनीची तीव्रता मोजण्यात आली. त्यावेळी 63.2 डेसिबल आवाजाची नोंद झाली. त्यानंतर पोलिसांनी इमारतीच्या 12व्या मजल्यावर साऊंड लेव्हल मीटरद्वारे तपासणी केली असता ध्वनितीव्रता तब्बल 100.6 डेसिबल असल्याचं आढळून आलं.

दोघांना घेतलं ताब्यात

तपासादरम्यान एवढ्या मोठा आवाज 13व्या मजल्यावरील ‘हिचकी बार अँड रेस्टॉरंट’ असल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर पोलीस पथकाने बारमध्ये छापा टाकून सुरू असलेला डीजे तत्काळ बंद पाडला. पोलिसांनी डीजेचं साहित्य जप्त केलं. या कारवाईत डीजे ऑपरेटर दीप शंकरराव मोरे (वय 22, श्रीकृष्णनगर, वाठोडा) आणि बारचा मॅनेजर अभय केशव विरखेडे (वय 44, कोलते ले-आऊट, मानकापूर) यांना ताब्यात घेण्यात आलं. पोलिसांनी दोघांची चौकशी करून ध्वनिप्रक्षेपणासंदर्भातील नियमांचं उल्लंघन झाल्याची नोंद केली. पोलीस आयुक्तांनी ध्वनिप्रक्षेपणाबाबत जारी केलेल्या मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी अनुप लोलुसरे यांच्या तक्रारीवरून सदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जप्त केलेलं डीजे साहित्य पोलिसांनी ताब्यात घेतलं असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Maharashtra TimesUlhasnagar Crime : लग्नात बापाने भरपूर हुंडा दिला, तरीही इंजिनिअर पतीसह सासरच्यांकडून पैशांचा तगादा, उच्चशिक्षित महिलेचं टोकाचं पाऊल; चिमुकली पोरकी

डीजेवरील निर्बंधांची अंमलबजावणी कडक

नागपूर शहरात डीजेच्या वाढत्या आवाजामुळे नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता पोलीस प्रशासनाने निर्बंधांची अंमलबजावणी कडक केली आहे. विशेषतः रात्रीच्यावेळी बार, पब, कॅफे आणि रेस्टॉरंटमध्ये नियमांचं उल्लंघन होत आहे का? याची तपासणी केली जात आहे. निर्धारित ध्वनिमर्यादा आणि पोलिसांच्या आदेशांचं उल्लंघन करणाऱ्यांवर यापुढेही कठोर कारवाई केली जाईल. बार, पब, कॅफे आणि रेस्टॉरंट चालकांनी नियमांचं पालन करावे, अन्यथा डीजेचं साहित्य जप्त करण्यासह कायदेशीर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा पोलीस प्रशासनानं दिला आहे.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा