• Fri. Sep 11th, 2026

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेच्या प्रस्तावांना तातडीने मंजुरी द्यावी : उद्योग व मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Sep 10, 2026

नंदुरबार, दि.10 सप्टेंबर 2026(जिमाका वृत्तसेवा): जिल्ह्यातील युवक-युवतींना स्वयंरोजगाराच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत (CMEGP) प्राप्त प्रस्तावांना संबंधित बँकांनी तातडीने मंजुरी द्यावी, असे निर्देश उद्योग व मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिले.

जिल्हा उद्योग विभागाची आढावा बैठक रंगावली सभागृहात संपन्न झाली. यावेळी आमदार चंद्रकांत रघुवंशी, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ.अनबलगन पी, अपर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, निवासी उपजिल्हाधिकारी आशा संघवी नाशिक विभाग उद्योग सह आयुक्त वृषाली सोने, जिल्हा उद्योग केंद्राचे सहायक आयुक्त (उद्योग व सेवा ) निलेश गायकवाड आदी उपस्थित होते.

उद्योग व मराठी भाषा मंत्री डॉ. सामंत म्हणाले की, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेच्या माध्यमातून स्थानिक युवकांना उद्योग-व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून दिले जाते. त्यामुळे या योजनेअंतर्गत बँकांकडे प्रलंबित असलेल्या प्रस्तावांची विनाकारण विलंब न करता तपासणी करून पात्र प्रस्तावांना तातडीने कर्जमंजुरी द्यावी.  यासाठी बॅकने नाकारलेल्या प्रकरणासाठी विशेष कॅम्पचे आयोजन करावे. या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी दरमहा आढावा घेवून येत्या 60 दिवसाच्या आत कर्ज प्रकरणे मंजुरी करुन अहवाल सादर करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्यात. यावेळी बँकांचे प्रतिनिधी, तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

 

00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed