• Fri. Sep 11th, 2026

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पदभरतीबाबत मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न                 – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Sep 9, 2026

मुंबई, दि. ९ : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील पदभरती संदर्भात सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज आढावा बैठक घेण्यात आली.

या बैठकीस मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील, सहकार आयुक्त दीपक तावरे, सहसचिव संतोष पाटील, अतिरिक्त निबंधक नामदेव यगलेवाड यांच्यासह सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते. बैठकीत सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पदभरतीसंदर्भातील विविध बाबींचा सविस्तर आढावा घेण्यात आला. बँकेची आर्थिक व प्रशासकीय स्थिती, उपलब्ध मनुष्यबळ, रिक्त पदे, नोकरभरतीची आवश्यकता तसेच संबंधित नियम व निकष याबाबत सविस्तर माहिती घेण्यात आली.

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कामकाज अत्यंत उत्कृष्ट असून, बँकेची चांगली आर्थिक व प्रशासकीय कामगिरी लक्षात घेता नोकरभरतीच्या विषयावर निश्चितच सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. यासंदर्भातील संपूर्ण माहिती घेऊन सर्व बाबींचा विचार करून सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी यावेळी सांगितले.

0000

काशीबाई थोरात/विसंअ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed