Pune Crime:पुणे शहरांत घडणाऱ्या गुन्ह्यांची आकडेवारी ही जास्त असल्याच आढळून आलं आहे. पुणे पोलिसांनी दिलेल्या आकडेवारीवरून हे स्पष्ट झाल आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
कुलदीप जाधव, पुणे : शहरात यंदा जीवे मारण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे पोलिसांच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. चालू वर्षात ऑगस्ट २०२६पर्यंत शहरात ६१ घटना झाल्या असून, गेल्या वर्षी याच कालावधीत ५७ घटनांची नोंद झाली होती. त्याच्या तुलनेत जावे मारण्याच्या प्रयत्नांच्या गुन्ह्यांमध्ये मात्र मोठी घट झाली आहे.
पुणे शहरातील ४४ पोलिस ठाण्यांतील दाखल
पुणे शहरातील ४४ पोलिस ठाण्यांतील दाखल गुन्ह्यांचा २०२४ आणि २०२५ या पूर्ण वर्षातील आकडे; तसेच ऑगस्टपर्यंतच्या कालावधीतील तुलनात्मक आढावा घेतला असता २०२४मध्ये शहरात वर्षभरात ९४ घटना झाल्या होत्या. २०२५मध्ये ही संख्या ८४वर आली. मात्र, यंदा वर्षातील आठ महिने पूर्ण होण्यापूर्वीच ६१ घटना झाल्या आहेत. ऑगस्टपर्यंत ५७ घटना झाल्या होत्या. यंदा त्याच कालावधीत ६१ हा आकडा गेला आहे.
काही ठिकाणी एकही घटना नाही
पोलिस ठाणेनिहाय पाहता भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत पाच, वाघोली पोलिस ठाण्याच्या हद्दीत चार, तर खडक, पर्वती, वारजे माळवाडी, नांदेड सिटी, येवलेवाडी आणि चंदननगर या भागांत प्रत्येकी तीन घटना झाल्या आहेत. काही पोलिस ठाण्यांच्या हद्दीत मागील वर्षीच्या तुलनेत जीवे मारण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, काही ठिकाणी एकही घटना झालेली नाही.
Thane News: ठाण्याला १६.५४ किमी लांबीचा ‘आनंद ग्रीन बेल्ट’; दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या नावावरून आनंदवन उभारण्याचा महापालिकेचा प्रयत्न
जीवे मारण्याचे प्रयत्न झाले कमी
जीवेमारण्याच्या प्रयत्नांच्या गुन्ह्यात घट झालेली आहे. खडक येथे जीवेमारण्याच्या प्रयत्नांचे सर्वाधिक सहा गुन्हे दाखल आहेत. भारती विद्यापीठमध्ये पाच, स्वारगेट आणि मार्केट यार्डमध्ये प्रत्येकी पाच, तर कोंढवा आणि इतर काही पोलिस ठाण्यांच्या हद्दीतही अशा स्वरूपाचे गुन्हे नोंदविले गेले आहेत.
Indian Navy: भारतीय नौदलाच्या ताफ्यात आयएनएस निपुण दाखल, पाण्याखाली बचावकार्य करणारी ठरली दुसरी युद्धनौका
दुखापतीच्या गुन्ह्यांत घट
हाणामारीतून होणाऱ्या दुखापतीच्या गुन्ह्यांमध्ये यंदा घट झाली आहे. सात ऑगस्ट २०२५पर्यंत ९२३ गुन्हे दाखल झाले होते. यंदा याच कालावधीत ही संख्या ८६२ झाली आहे. त्यामुळे ६१ गुन्ह्यांची घट झाली आहे. सन २०२४मध्ये याच कालावधीत ९४५ गुन्हे घडले होते.
लेखकाबद्दलकांचन परुळेकरकांचन परुळेकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कन्सलटंट पदावर कार्यरत आहेत. कांचन स्थानिक बातम्या, पायाभूत सुविधा, बांधकाम आणि विकास प्रकल्प यासाठी लिखाण करतात. त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात ही महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमधून झाली. मार्च २०२६ मध्ये महाराष्ट्र टाइम्सच्या व्हिडिओ विभागात त्यांनी इंटर्न म्हणून काम केले. सुरुवातीला त्यांनी युट्यूब, फेसबुक आणि इन्स्टाग्रामसाठी कन्टेंट तयार करताना व्हिडिओ आणि लेख लिहिले आहेत. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, स्थानिक बातम्या आणि क्राइमसह स्पोर्ट्सवर इत्यादी विषयांचे वाचन आणि लेखन करण्याची त्यांना विशेष आवड आहे.
कांचन यांचे संपूर्ण शिक्षण मराठी माध्यमातून झाले असून पत्रकारितेची आवड असल्याने त्यांनी कोकण ते मुंबई असा शैक्षणिक प्रवास केला. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण गावी पूर्ण केले. इकोनॉमिक्स या विषयातून पद्वी घेतली. लिखाणाची आवड, संवाद साधण्याचे कौशल्य आणि पत्रकारितेची आवड समजून घेऊन साठ्ये कॉलेज विलेपार्ले येथे वृत्तपत्रविद्या आणि संवाद या विषयात त्यांनी पद्व्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेतला.
महाविद्यालयीन काळात कला आणि नाटक विषयात विशेष आवड असल्याने त्यांनी अभिनयदेखील केले आहे. काही नाटक त्यांनी लिहिले आहेत. मुंबई विद्यापीठाच्या युथ फेस्टिवलमध्ये त्यांना अभिनयासाठी ब्रॉन्झ आणि सिल्व्हर मेडल देण्यात आले आहेत. कविता आणि लेख लिहिण्याची आवड असल्याने शाळा ,कॉलेज मासिक अंकात त्यांचे लेख देखील प्रसिध्द झाले आहेत.
२०२६ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन सोबत जोडल्या गेल्यानंतर त्यांची पत्रकारितेची आवड अगदी स्पष्ट झाली. बोलण्यातला स्पष्टपणा लिखाणातली पारदर्शकता अधिक नव्याने समजत गेली. तीन महिन्यांच्या इंटर्नशिप नंतर त्या आता कन्सलटंट पदावर म.टा. समुहात सहभागी झाल्या आहेत. पारदर्शकता आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहचवण्याचं काम त्या करत आहेत.… आणखी वाचा