मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षण संदर्भातील मागण्यांसाठी जालना येथे उपोषण सुरू आहे. मनोज जरांगेंसोबतच जालन्यात ब्राह्मण समाजाचे देखील उपोषण सुरू आहे. मात्र ब्राह्मण समाजाच्या उपोषणाकडे सरकार दुर्लक्ष करतंय असा आरोप केला जातोय. उपोषणकर्ते दीपक रणनवरे यांनी राज्य सरकारला इशारा देत महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत. ब्राह्मण समाजातील मुलांना मोफत शिक्षण मिळावे, यासारख्या त्यांच्या मागण्या आहेत. तसेच परशुराम आर्थिक विकास महामंडळाला भरघोस निधी मिळावा अशी त्यांची मागणी आहे.