जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षकांची हजारो पदं रिक्त असताना विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण कसे मिळणार, असा संतप्त सवाल उपस्थित करत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार निलेश लंके यांनी जिल्हा परिषदेच्या आवारात उपोषण सुरु केले आहे. तब्बल २ हजार ६५७ शिक्षकांच्या रिक्त पदांमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले असल्याचा गंभीर आरोप लंके यांनी केला आहे. मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण मागे घेणार नाही, असा स्पष्ट इशारा लंके यांनी प्रशासनाला दिला आहे.