मराठा समाजानंतर आता धनगर समाज देखील रस्त्यावर उतरणार आहे. बारा वर्षांपूर्वी धनगर समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट करण्याबाबतच्या आश्वासनाची पूर्तता करा या मागणीसाठी धनगर समाज एल्गार करणार असल्याने फडणवीस सरकारची डोकेदुखी आणखी वाढणार असल्याची शक्यता आहे. धनगर समाजाचे नेते दीपक बोऱ्हाडे यांनी हा महाएल्गार पुकारण्याची घोषणा केली आहे.