• Thu. Aug 27th, 2026

Thane News : ठाण्यात क्लस्टरविरोधात धडक मोर्चा, हजारो नागरिक क्लस्टर कार्यालयावर धडकले, नियोजनशून्य कारभाराचा आरोप, आंदोलकांकडून संताप व्यक्त

ठाण्यात क्लस्टरविरोधात हजारो नागरिर रस्त्यावर उतरले. आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वात हजारो आंदोलक क्लस्टर कार्यालयावर धडकले. यावेळी आंदोलकांकडून संताप व्यक्त करण्यात आला.

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
विनित जांगळे, ठाणे : ठाणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये क्लस्टर पुनर्विकास योजना राबविण्यासाठी ‘क्लस्टर विकास कंपनी’ स्थापन करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. या कंपनीसह शहरात एकूण क्लस्टर पुनर्विकासाचा कारभार नियोजनशून्य सुरु असल्याचा आरोप करत गुरुवारी ठाणे शहरात भव्य मोर्चा काढण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या धडक मोर्चात हजारो नागरिकांनी रस्त्यावर उतरत तीन हात नाका ते क्लस्टर पुनर्विकास कार्यालयावर धडक दिली. पोलिसांनी मोर्च्याला परवानगी नाकारल्याचा आरोपही होत असतानाच प्रशासनाला या प्रकल्पातील दिरंगाई आणि अंमलबजावणीबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आल्याने या प्रकल्पावरच आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

सत्ताधारी भाजपचाही विरोध

ठाण्यात क्लस्टरची अंमलबजावणी ‘क्लस्टर विकास कंपनी’ला देण्याच्या ठरावाला सभागृहाबाहेर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासह सत्तेत सहभागी असलेल्या भाजपनेही विरोध केला आहे. सत्ताधाऱ्यांनी बहुमताच्या जोरावर हा ठराव मंजूर केल्याचा आरोप या दोन पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी केला. या ठरावामुळे ठाणे शहरातील विकासात्मक धोरणे ठरविण्याचा अधिकार पालिकेऐवजी कंपनीला मिळणार असल्याचा आरोप करीत हा मोर्चा काढण्यात आला होता.

मोर्चेकऱ्यांनी हातात क्लस्टर कंपनीचा निषेध करणारे फलक घेतले होते. तीन हात नाक्यावरुन सुरू झालेल्या हा मोर्चाचा क्लस्टर कार्यालयावर समारोप करण्यात आला. ही कंपनी म्हणजे ‘तैनाती फौज’ असल्याचा आरोप करीत कंपनीच्या हातातील क्लस्टरचा कारभार काढून घ्यावा, अशी मागणी पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी केली.

Maharashtra TimesVersova-Dahisar-Bhayandar Coastal Road : 2 तासांचा प्रवास 20 मिनिटांवर येणार, वर्सोवा-दहिसर-भाईंदर प्रकल्पाचे काम सुसाटक्लस्टर कार्यालयात पालिकेचे उपायुक्त दीपक झिंजाड यांना आव्हाड यांच्यासह पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान, पालिका गटनेते अभिजित पवार, विरोधी पक्षनेते शानू पठाण, नगरसेवक सुधीर भगत, मनिषा भगत यांनी याप्रश्नी निवेदन सादर केले.

कंपनीच्या घशात 130 कोटी

आजमितीस ठाण्याला पाणी मिळत नाही. रस्त्यांवर वाहतूक कोंडी होते. नगरसेवक निधीत कपात केली जात असताना या कंपनीच्या घशात 130 कोटी रुपये दिले जातात. म्हणजे काहीही करून पैसे जमवायचे. हा प्रकार गेले अनेक वर्षे ठाण्यात चालू आहे, असा आरोप आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला. मेट्रो, रिंग रेल्वे, एका प्रकल्पासाठी तीन – तीन हजार झाडं कापतात. ठाण्यामध्ये कधी एवढी उष्णता होती का आधी? त्यामुळे ठाण्याचं वाटोळं करण्याचा हा डाव आहे, असेही आव्हाड यांनी याप्रसंगी म्हटले.

Maharashtra TimesShilpa Gaware : पुण्यात उच्चभ्रू कुटुंबांतील महिलेने स्वत:ला संपवलं, सासरच्यांवर हुंडा आणि छळाचे गंभीर आरोप

‘ठाणेकर उपाशी, कंपनीचा कारभार तुपाशी’

स्थानिक स्वराज्य संस्थांना भारतीय संविधानाच्या 74 व्या घटनादुरुस्ती कायदा, 1992 नुसार कलम 243-डब्ल्यू अन्वये दिलेल्या अधिकारांचा भंग केला आहे, असा आरोप यावेळी जिल्हाध्यक्ष प्रधान यांनी केला. शहरात चार हजार एकरांवर क्लस्टरच पुनर्विकास होत असताना तब्बल तीस एमएलडी पाणी टंचाई असल्याचे त्यांनी नमूद केले. या विरोधात आम्ही आक्रमकपणे रस्त्यावर उतरणार. आज सर्वसामान्य ठाणेकरांचा 12 टक्के आणि 20 टक्के मालमत्ता कर वाढवत असताना असे 130 कोटी रुपये तुम्ही एका क्लस्टरच्या एका क्लस्टरच्या कंपनीला देता? या कंपनीत कोण आहे; त्यांची नावे जाहीर करा, असा प्रश्न प्रधान यांनी उपस्थित केला.