Mumbai Daughter performs Mother Last Rites : चार वर्षांपूर्वीच वडिलांचे निधन झाले, आता मातृछत्रही काळाने हिरावून नेले. आपल्या आईच्या चितेला मुखाग्नी देत मुंबईतील शामली सुवरे हिने केवळ अंत्यसंस्काराचंच कर्तव्य पार पाडलं नाही, तर ‘मुलगा-मुलगी समान’ या विचारांचा संदेशही आपल्या कृतीतून दिला आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई/रत्नागिरी : निष्ठूर नियतीचा खेळ कधी कोणाला कळला नाही, असं म्हणतात. याचाच प्रत्यय देणारी एक धक्कादायक घटना मुंबईतील भांडुप परिसरात घडली. मूळचे रत्नागिरी जिल्ह्यातील उक्षी येथील सुवरे कुटुंबाची काही वर्षांतच ताटातूट झाले. चार वर्षांपूर्वीच वडिलांचे निधन झाले, त्यातच आता मातृछत्रही काळाने हिरावून नेले. मात्र तरीही या मोठ्या दुःखद प्रसंगाला खंबीरपणे सामोरे जात मुलीने रुढी-परंपरांच्या पलिकडे जाण्याचा निर्णय घेतला. आपल्या आईच्या चितेला मुखाग्नी देत केवळ अंत्यसंस्काराचंच कर्तव्य पार पाडले नाही, तर ‘मुलगा-मुलगी समान’ या विचारांचा संदेशही या कृतीतून दिला आहे.
मुलींचा आईच्या पार्थिवाला मुखाग्नी
छाया चंद्रकांत सुवरे यांच्या निधनानंतर त्यांची मुलगी शामली चंद्रकांत सुवरे हिने आपल्या लाडक्या आईला मुखाग्नी दिला. त्यावेळी उपस्थितांचे डोळे पाणावले. मुलींचे वडील एका खाजगी कंपनीत काम करत होते. तर आई एका गारमेंट शॉपमध्ये कामाला होती, घरची परिस्थिती बेताची. अशावेळी दुःखद प्रसंगात या मुलींनी दाखवलेलं धाडस हे कौतुकास्पद ठरलं आहे
मूळच्या कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील उक्षी बनाची वाडी हे माहेर असलेल्या आणि कोंडये गाव हे सासर असलेल्या छाया माणिक सापटे ऊर्फ छाया चंद्रकांत सुवरे. त्यांचे मुंबईतील भांडुप येथे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने आकस्मिक निधन झाले. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने कुटुंबीय, नातेवाईक आणि दोन्ही गावांतील ग्रामस्थांवर शोककळा पसरली.
Nashik Murder : पंधरा वर्ष लिव्ह इन रिलेशन, पण 37 वर्षांच्या हसीनाला नवा बॉयफ्रेण्ड मिळाला, सातपुतेने रंगेहाथ पकडताच भयंकर घडलं, बॉडी कसारा घाटात
आई-वडील दोघांचाही हार्ट अटॅकने मृत्यू
अवघ्या चार वर्षांपूर्वी छाया सुवरे यांचे पती चंद्रकांत सुवरे यांचेही हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले होते. पतीच्या निधनाचा धक्का पचवत त्या कुटुंब सावरत होत्या. दोन लेकींच्या उच्च शिक्षणाचे स्वप्न पाहत त्यांना शिकवले, मुलींनीही आपल्या आईला साथ देण्याचा निर्धार करत तिला सुखाचे दिवस दाखवण्याचं स्वप्न पाहिलं होतं, मात्र नियतीने पितृछत्र ओरबाडून नेल्यानंतर पुन्हा एकदा लेकींवर घाला घालत छाया सुवरे यांनाही हिरावून घेतले. आई-वडिलांच्या निधनामुळे दोन्ही मुलींवरही दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
आईचे अंत्यसंस्कार करण्याच्या मुलींच्या या निर्णयाला उक्षी आणि कोंडये गावातील ग्रामस्थांनीही पाठिंबा दिला. त्यांच्या निर्णयाचा आदर करत ग्रामस्थांनी दोन्ही मुलींना प्रोत्साहन दिले आणि या कठीण प्रसंगी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे कुटुंब व गावकरी उभे राहिले. त्यानंतर भांडुप येथील स्मशानभूमीत भावपूर्ण वातावरणात छाया सुवरे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांची मुलगी शामली सुवरे हिने आपल्या आईच्या चितेला अग्नी देत मुलीचे कर्तव्य पार पाडले.
आईला अखेरचा निरोप देताना मुलींच्या डोळ्यांतही अश्रू होते, सारे वातावरणच भावूक झाले होते. मोठा दुःखद कठीण प्रसंग होता. दुःखाच्या प्रसंगीही मुलींनी घेतलेल्या या धाडसी आणि संवेदनशील निर्णयाचे उपस्थित ग्रामस्थांनी कौतुक केले.
Twisha Sharma : बायकोचे अवशेष उद्या न्यायला सांग, आता मला शांततेत मरु दे; Ex मिस पुणेचा वहिनीला शेवटचा मेसेज, काही मिनिटात मृत्यूला मिठी
बदलत्या विचारधारांचं प्रतीक
शामली सुवरे यांनी घेतलेला हा निर्णय केवळ एका कुटुंबापुरता मर्यादित नसून समाजातील बदलत्या विचारसरणीचे प्रतीक ठरला आहे. मुलगी ही केवळ ‘परक्याचे धन’ नसून तीही आई-वडिलांची जबाबदारी, प्रेम आणि कर्तव्य तितक्याच समर्थपणे निभावू शकते, हा संदेश या घटनेतून मिळाला आहे. उक्षी व कोंडये येथील ग्रामस्थांनी या दुःखद प्रसंगी मुलींच्या पाठीशी खंबीर उभे राहत साथ देत अवघ्या जगासमोर एक आदर्श ठेवला आहे.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा