• Tue. Aug 18th, 2026

Jalgaon News : जळगाव जिल्ह्यातील पारोळामध्ये हृदयद्रावक घटना समोर आली आहे. शेवरे दिगर येथे झालेल्या ग्रामसभेत तेथील ग्रामसेवकाचा मृत्यू झाला आहे. या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे.

शेवरे दिगर ग्रामसेवकाचा मृत्यू(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
निलेश पाटील, जळगाव : जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यामधील शेवरे दिगर येथे पार पडलेल्या 15 ऑगस्टच्या ग्रामसभेत वाद निर्माण होऊन ग्रामसेवकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक आणि दुर्दैवी घटना घडली आहे. प्रल्हाद पाटील (वय 54, रा. ओम नगर, पारोळा) असं मृत ग्रामसेवकाचं नाव आहे.

कामांच्या जुन्या बिलावरून वाद

शेवरे दिगर येथे 15 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजेच्या सुमारास ग्रामसभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेला गावातील तरुण मंडळींसह सरपंच, पोलीस पाटील व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. सभा सुरू असताना जुन्या कामांच्या बिलावरून ग्रामस्थ आणि ग्रामसेवक प्रल्हाद पाटील यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. या वादातून प्रचंड मानसिक धक्का बसल्यानं अस्वस्थ वाटू लागल्यामुळे ग्रामसेवक पाटील हे सभेतून निघून आपल्या घरी गेले.

Maharashtra TimesMumbai News : आधी बाबा गेले, आता आई! लेकीच्या धाडसी निर्णयाला नातेवाईकांची साथ, माऊलीच्या पार्थिवाला मुखाग्नी, भांडुपवासियांचे डोळे पाणावले

हृदयविकाराचा तीव्र झटका

तब्बेत खालावल्याने त्यांना तत्काळ पारोळा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, प्रकृती अधिक चिंताजनक झाल्यानं पुढील उपचारासाठी दुसऱ्या दवाखान्यात नेलं जात असतानाच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांचीप्राणज्योत मालवली. ही घटना काल सोमवारी दुपारी 2 वाजेच्या सुमारास घडली. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे.

एका आरोपीस अटक

17 ऑगस्ट रोजी झालेल्या ग्रामसभेमध्ये ग्रामसेवक त्यांच्याशी वाद करणारा संशयित आरोपीस अटक करण्यात आली आहे. सदर घटनेची माहिती मिळताच पारोळा पोलीस ठाण्याने तातडीने कारवाई करत संबंधित सात आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०५ (सदोष मनुष्यवध) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या घटनेची माहिती मिळताच ग्रामसेवक संघटनेचे पदाधिकारी पारोळा पोलीस ठाण्यात जमले आणि तिथे प्रल्हाद पाटील यांच्या ग्रामसभेतील वादामुळे मृत्यू झाला असून संशयितांना अटक करण्याची मागणी करीत त्यांनी ते आंदोलन सुरू केलं. त्यानंतर या आंदोलनाची दखल घेत पोलिसांनी संशयित एका आरोपीस अटक केलेली आहे.

Maharashtra TimesNashik Murder : पंधरा वर्ष लिव्ह इन रिलेशन, पण 37 वर्षांच्या हसीनाला नवा बॉयफ्रेण्ड मिळाला, सातपुतेने रंगेहाथ पकडताच भयंकर घडलं, बॉडी कसारा घाटात

जुन्या किरकोळ वादातून वर्गमित्राचे गंभीर कृत्य

दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादाचा राग मनात धरून इयत्ता दहावीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थ्याने त्याच्याच वर्गातील पंधरा वर्षीय मित्रावर चॉपरने प्राणघातक हल्ला केला. ही घटना शुक्रवारी (दि. ७) सकाळी आयोध्यानगर भागातील रायसोनी शाळेपासून शंभर मीटर अंतरावर घडली.

कुसुंबा येथील पंधरावर्षीय विद्यार्थी बी. यू. एन. रायसोनी शाळेत दहावीत शिक्षण घेतो. त्याने शाळेच्या मुख्याध्यापकांकडे खासगी क्लास लावलेला आहे. शुक्रवारी सकाळी क्लास संपल्यानंतर हा विद्यार्थी इतर मित्रांसह शाळेच्या दिशेने जात होता. त्याचवेळी, क्लासमधून तासभर आधीच निघालेला त्याचा वर्गमित्र मागून हातात चॉपर घेऊन आला. त्याने अचानक या विद्यार्थ्याच्या बरगडीवर चॉपरने जोरदार वार करीत तो गोल फिरवला.

Maharashtra TimesNashik Crime : ‘आपल्यातील वाद मिटवून टाकू’; शेकहँड करत निर्घृणपणे संपवलं, नाशकातील सुमित पगारेच्या हत्येचं खरं कारण समोर

विद्यार्थ्यावर उपचार सुरु

घटनेचे गांभीर्य पाहून परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमी विद्यार्थ्याला जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. माहिती मिळताच त्याचे वडील तेथे पोहोचले आणि त्यांनी त्याला पुढील उपचारांसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलवले. सध्या त्याच्यावर वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा