• Fri. Aug 14th, 2026

    Pune News: वीस कंपन्या चाकणबाहेर! मुख्यमंत्री, उद्योगमंत्र्यांचा दावा खोटा; उद्योजकांचा आरोप

    म. टा. प्रतिनिधी, पुणे : वाहतूक कोंडी, खड्ड्यांचे आणि कचऱ्याचे साम्राज्य, प्रदूषण, पाणी आणि वीज उपलब्ध नसणे, या रोजच्या त्रासाला कंटाळून चाकण औद्योगिक वसाहतीमधील वीस कंपन्यांनी सातारा जिल्ह्यातील खंडाळा औद्योगिक वसाहतीमध्ये स्थलांतरित होण्याचा निर्णय बुधवारी जाहीर केला.

    ‘चाकणमधून कंपन्या बाहेर जात नाहीत, हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांचा दावा खोटा आहे. वाहतूक कोंडी आणि इतर प्रश्न सोडविण्यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न अपुरे आहेत.

    Sonali Gaikwad : मोशी दुर्घटनेत पतीचा मृत्यू, महिन्याभरात पत्नी सोनाली गायकवाड यांनी आयुष्य संपवलं, चिमुकल्या श्रेया-प्रियाचं छत्र हरपलं‘पुणे – नाशिक महामार्गावर भोसरी ते चाकण (आंबेठाण चौक) यादरम्यान रोज वाहतूक कोंडी असते. शहरातून चाकण एमआयडीसीमध्ये पोहोचण्यासाठी दोन ते चार तास लागतात. या कोंडीमुळे काही कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. दुसऱ्या सत्राचे (शिफ्ट) कर्मचारी वेळेवर पोहचू शकत नसल्याने कंपन्यांचे उत्पादन घटले आहे. या त्रासाला कंटाळून कंपन्यांनी स्थलांतराचा निर्णय घेतला.

    ‘पायाभूत सुविधा पुरवण्याचे राज्य सरकारचे प्रयत्न अपुरे आहेत,’ अशी टीका फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीजचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप बटवाल यांनी केली.

    ‘चाकण एमआयडीसीमध्ये तीन हजार राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कंपन्या आहेत. त्यामध्ये १५ लाख कर्मचारी आहेत. ७५० लघू उद्योगांची वार्षिक उलाढाल ३२ हजार कोटी रुपये आहे. अपुऱ्या सोयीसुविधांमुळे या कंपन्यांचे नुकसान होत आहे. स्थलांतर करणाऱ्या वीस कंपन्यांची वार्षिक उलाढाल एक हजार कोटी रुपये असून, येथे काम करणाऱ्या चार हजार कर्मचाऱ्यांशी स्थलांतरणाविषयी बोलणी सुरू आहेत,’ असे उद्योजक धनंजय शेडबाळे, कुणाल कड, शंतनू कुलकर्णी आणि जयदेव अक्कलकोटे यांनी स्पष्ट केले.

    Maharashtra TimesBaramati Crime : लग्न ठरलेल्या प्रियकराशी गोळी घेऊन संबंध, बारामतीत तरुणीचा गूढ मृत्यू, मैत्रिणीच्या हवाल्याने आईचा मोठा आरोप‘कर्मचाऱ्यांना रोज चार-पाच तास प्रवास करून पोहोचणे शक्य नसल्याने काही कंपन्यांनी शहराच्या मध्यवर्ती भागात कार्यालये सुरू केली. मात्र, त्याचा आर्थिक ताण सहन करावा लागत आहे,’ याकडे उद्योजकांनी वेधले.

    ३६ हजार कंपन्या बंद

    नाशिक : गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्रातील ३६,२११ कंपन्या बंद पडल्याचे केंद्र सरकारने लोकसभेत सांगितले. शिवसेना उबाठाचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती आहे.

    उद्योजकांचे म्हणणे
    -पायाभूत सुविधा आणि वाहतूक व्यवस्थापनातील समस्यांमुळे पन्नासहून अधिक उद्योग इतर राज्यांमध्ये स्थलांतरित;
    -मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांपैकी निम्म्या रस्त्यांची अवस्था दयनीय; पाच किलोमीटर अंतरासाठी दोन तास लागतात
    -खराब रस्त्यांमुळे वाहनांचे नुकसान; देखभालीचा खर्च वाढला
    -खड्डयांमुळे अपघाती मृत्यू वाढले

    Maharashtra TimesAccident News: भीषण! एंडेव्हर कारसह चार वाहनांची धडक; काळजाचा थरकाप उडवणाऱ्या अपघातात निलेश लंकेंनी जीवलग मित्र गमावलाप्रशासकीय अधिकारी नेमा
    ‘ग्रामपंचायत, नगर परिषदा, महापालिका, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए), महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी), राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) या यंत्रणांमध्ये समन्वय नसल्याने संयुक्त आढावा समिती नेमावी. या समितीच्या प्रमुखपदी प्रशासकीय अधिकारी नेमून अडचणी सोडवाव्यात,’ अशी मागणी फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रिजने केली.

    २० स्थलांतर करणाऱ्या कंपन्या
    ४००० स्थलांतरित होणाऱ्या कंपन्यांमधील कर्मचारी
    १००० कोटी रुपये स्थलांतरित होणाऱ्या कंपन्यांची एकत्रित वार्षिक उलाढाल

    १३ किलोमीटरसाठी चार तास
    पिंपरी : पुणे-नाशिक महामार्गावर भोसरीतील गणेश साम्राज्य चौकातून सुरू होणारी वाहतूक कोंडी अगदी चाकणच्या आंबेठाण चौकापर्यंत असते. अवघे १३ किलोमीटर अंतर पार करण्यासाठी तीन ते चार तासांचा वेळ लागत आहे. त्यामुळे ‘पुणे-नाशिक महामार्गावरील प्रवास नको रे बाबा…’ म्हणण्याची वेळ आली आहे.

    वाहतूक कोंडीच्या समस्येबाबत मुख्यमंत्र्यांना तीन वेळा मेल पाठवला. मात्र, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. उद्योगांची आणि तेथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची अवस्था अतिदक्षता विभागातील रुग्णासारखी झाली आहे.-धनंजय शेडबाळे, उद्योजक

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed