Nashik News: नाशिकमध्ये सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर कामांना वेग आलेला आहे.आखाड्यांच्या सुविधांना चालना मिळाली आहे. नाशिकमधील तीन त्र्यंबकेश्वरमधील दहा प्रमुख आखाड्यांपलीकडे आता इतर आखाड्यांसाठी आणि पायाभूत सुविधांसाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध होणार आहे.
पायाभूत सुविधा उभारण्यासाठी पात्र संस्थांना आर्थिक सहाय्य
सर्व संबंधित संस्थांनी निर्धारित नमुन्यातील प्रस्ताव २५ ऑगस्टपर्यंत सादर करावेत, असे आवाहन प्राधिकरणामार्फत करण्यात आले आहे. प्राप्त प्रस्तावांची स्थानिक समित्यांकडून ३१ ऑगस्टपर्यंत प्राथमिक छाननी केली जाणार असून, पुढील कार्यवाहीसाठी ते कुंभमेळा प्राधिकरणाकडे पाठविण्यात येणार आहेत. या प्रक्रियेअंतर्गत संबंधित धार्मिक संस्था व स्थळांवर भाविकांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्यासाठी पात्र संस्थांना कमाल १५ लाख रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य दिले जाईल.
जिल्ह्याबाहेरील ठिकाणांकरिता सर्व अधिकार प्राधिकरणस्तरीय समितीकडे
कुंभमेळ्याच्या काळात भाविकांची संख्या लक्षात घेऊन आवश्यक सुविधा वेळेत उपलब्ध व्हाव्यात, तसेच निधीचे नियोजनबद्ध वितरण व्हावे, या उद्देशाने ही प्रक्रिया निश्चित केल्याची माहिती आयुक्त शेखर सिंह यांनी दिली. प्रमाणित कार्यपद्धतीनुसारमहापालिका क्षेत्रासाठी स्वतंत्र स्थानिक समिती, तर जिल्ह्यातील महापालिका क्षेत्राबाहेरील ठिकाणांसाठी जिल्हास्तरीय स्थानिक समिती स्थापन करण्यात आली आहे. या समित्यांकडून प्रस्तावांची प्राथमिक छाननी झाल्यानंतर ते कुंभमेळा प्राधिकरणाच्या स्तरावरील समितीकडे पाठविण्यात येतील. नाशिक जिल्ह्याबाहेरील ठिकाणांकरिता सर्व अधिकार प्राधिकरणस्तरीय समितीकडे असतील.
Sonali Gaikwad : मोशी दुर्घटनेत पतीचा मृत्यू, महिन्याभरात पत्नी सोनाली गायकवाड यांनी आयुष्य संपवलं, चिमुकल्या श्रेया-प्रियाचं छत्र हरपलं
जिल्हाधिकारी, महापालिका क्षेत्रासाठी समित्या
कुंभमेळा प्राधिकरणाने एसओपीसह जिल्हाधिकारी कार्यालय व महापालिका प्रशासनाला समित्यांची स्थापना करून प्रक्रिया तातडीने सुरू करण्याचे निर्देश दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारीकिंवा त्यांच्याकडून प्राधिकृत केलेले अधिकारी असतील. महापालिका क्षेत्रासाठीच्या समितीचे अध्यक्ष महापालिका आयुक्त किंवा त्यांनी प्राधिकृत केलेले अधिकारी असतील.
Pune Crime: पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारचा भलताच उद्योग; ८२ वर्षीय नागरिकाचे १० कोटी रुपये लुटले, रोहन जाधवला अटक
समितीचे सदस्य
पोलिस आयुक्त, नाशिकचे तहसीलदार, सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा व ‘एमएसआयडीसी’चे अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभागाचे विद्युत कार्यकारी अभियंता, महापालिकेचे उद्यान निरीक्षक आणि शहर अभियंता हे समितीचे सदस्य असतील. शहर अभियंता सदस्य सचिव म्हणून काम पाहतील.
