Nagpur Doctors Strike: 3 ऑगस्टच्या शासन निर्णयानुसार सीसीएमपी पूर्ण केलेल्या बीएचएमएस डॉक्टरांना महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये नोंदणी देण्यात येत आहे. यालाच निवासी डॉक्टरांनी विरोध केला आहे. या विरोधाच स्वरुप म्हणून डॉक्टरांनी संप पुकारलाय . या संपाच स्वरुप म्हणून ओपीडी , आयपीडी सह अनेक सेवा बेंद ठेवण्यात येणार आहे.
डॉक्टरांनीही बुधवारी ओपीडी बंद ठेवला
इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) आवाहनानुसार खासगी डॉक्टरांनीही बुधवारी ओपीडी बंदठेवून केवळ आपत्कालीन सेवा सुरू ठेवल्या. नागपूरच्या मेडिकल आणि मेयो रुग्णालयातील ओपीडी सेवा मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाल्या.
निवासी डॉक्टरांचा विरोध आहे
३ ऑगस्टच्या शासन निर्णयानुसार सीसीएमपी पूर्ण केलेल्या बीएचएमएस डॉक्टरांना महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये नोंदणी देण्यात येत आहे. यालाच निवासी डॉक्टरांचा विरोध आहे. वैद्यकीय शिक्षण व औषधे विभागाचे सचिव धीरज कुमार यांनी मार्डला पत्र पाठवून डॉक्टरांनी तातडीने कामावर रुजू व्हावे, असे आवाहन केले.
ही ‘सशर्त नोंदणी’ न्यायालयीन आदेशांच्या पालनासाठी असून, सीसीएमपी पात्र होमिओपॅथी डॉक्टरांना एमबीबीएस पदवीधारकांप्रमाणे समानता किंवा अतिरिक्त लाभ दिले जाणार नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
Mumbai Goa Highway : कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना दिलासा नाहीच; मुंबई-गोवा हायवेवर माणगाव-इंदापूर बायपास रखडलेलेच, मंत्र्यांकडून झाडाझडती
पुढील सुनावणी १३ ऑगस्ट रोजी
मात्र, नोंदणी प्रक्रिया तातडीने थांबविल्याशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नाही, अशी भूमिका केंद्रीय मार्डचे अध्यक्ष डॉ. अथर्व शिंदे यांनी मांडली. प्रकरण न्यायप्रविष्ट असताना नोंदणीची घाई का, असा सवाल त्यांनी केला. या प्रकरणाची पुढील सुनावणी १३ ऑगस्ट रोजी होणार असून, वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांसोबत चर्चेनंतर पुढील निर्णय घेतला जाणार आहे.
IMD Weather Forecast: पावसाचा चकवा, एल निनो असतानाही वाढते पाऊसमान; हवामान खातेही बुचकळ्यात, अलर्टबाबत कसा उडाला गोंधळ?
आपत्कालीन प्रयोगशाळा आणि जीव वाचविणाऱ्या सेवा सुरू राहतील
मार्डच्या निवेदनानुसार गुरुवारपासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतीलनिवासी डॉक्टर नियमित ओपीडी, आयपीडी, वॉर्ड फेऱ्या, नियोजित शस्त्रक्रिया, वैद्यकीय प्रक्रिया, शैक्षणिक उपक्रम, केंद्रीय प्रयोगशाळा आणि फिव्हर ओपीडी सेवा बंद ठेवणार आहेत. मात्र अपघात विभाग, ट्रॉमा केअर, आयसीयू, प्रसूती कक्ष, तातडीच्या शस्त्रक्रिया, रक्तपेढी, आपत्कालीन प्रयोगशाळा आणि जीव वाचविणाऱ्या सेवा सुरू राहतील, असे मार्डने स्पष्ट केले.
