• Tue. Sep 22nd, 2026

पोलिसांची व्हॅन अडवणाऱ्या रिया अहिरला धमक्या; राहुल गांधींची भेट घेत आंदोलक बेधडक बोलले

ByMH LIVE NEWS

Aug 6, 2026 #mt
पोलिसांची व्हॅन अडवणाऱ्या रिया अहिरला धमक्या; राहुल गांधींची भेट घेत आंदोलक बेधडक बोलले

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबईतील CJP आंदोलनाच्या समर्थनार्थ निघालेल्या मोर्चादरम्यान पोलिसांची व्हॅन अडवून व्हायरल झालेली रिया अहिर पुन्हा चर्चेत आली आहे. रियाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेत आपली व्यथा मांडली. खरंतर मुंबईत पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या विद्यार्थ्यांची सुटका करणाऱ्या रियाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल झाले. अनेकांनी तिचं कौतुक केलं. मात्र या प्रसंगामुळे तिला ट्रोल देखील करण्यात येत आहे. मॉडलिंग करणाऱ्या रियाला आक्षेपार्ह भाषेतील ट्रोलिंगला सामोरं जावं लागत असल्याने तिने पोलिसांत तक्रार दाखल केलेली. मात्र अद्याप एफआयआर नोंदवण्यात आलेला नसल्याचा दावा तिने केला आहे. दरम्यान २० जुलैला दिल्लीत झालेल्या CJP आंदोलनात नागपूरच्या भरत बनाईत यांचाही व्हिडिओ व्हायरल झालेला. पोलिसांसमोर निर्भीडपणे उभं राहून सर मला मारा असे म्हणणारा भरत आणि इतर राज्यातील काही विद्यार्थ्यांची काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिल्लीत भेट घेतली. ट्रोलिंग आणि पोलिसांकडे केलेल्या तक्रारींची माहिती त्यांनी राहुल गांधींना दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed