एसटी चालवताना किंवा कर्तव्यावर असताना रील, व्हिडीओ, लाइव्ह स्ट्रीमिंग आणि युट्यूब शॉर्ट्स यांसह अथवा कोणत्याही प्रकारच्या सोशल मीडियासाठी आशय तयार करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याचे लेखी आदेश एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक माधव कुसेकर यांनी दिले आहेत.
Aditya Thackeray: गाडी-बंगल्याची मागणी, आदित्य ठाकरेंनी भाजप-शिंदेंना कोंडीत पकडलं; मुख्यमंत्र्यांकडे महत्त्वाची मागणी
वाहक नंदा कोळी यांनी एसटीच्या गणवेशात पनवेल आगारातील नियंत्रण कक्षात रील तयार केले. यात पनवेलमधील दोन्ही वाहतूक नियंत्रक सहभागी असून, एक वाहतूक नियंत्रक गुलाबाचे फूल देत असल्याचे व्हायरल व्हिडीओत दिसून आले आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड करण्यात आला. व्हिडीओला फेसबुकवर सात लाख ५१ हजार व्ह्यूज आहेत. व्हिडीओची सत्यता पडताळल्यानंतर मुंबई विभागाने कारणे दाखवा नोटीस बजावली आणि त्यानंतर तिघांना निलंबित केले.
आगार, बसस्थानक, कार्यालय किंवा एसटी बसमध्ये महामंडळाचा गणवेश परिधान करून कोणत्याही प्रकारचे व्हिडीओ किंवा सोशल मीडिया सामग्री तयार करण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच, महामंडळाची प्रतिमा मलिन होईल किंवा नकारात्मक संदेश जाईल, असे व्हिडीओ प्रसारित करण्यास मनाई करण्यात आली आहे.
Abhijeet Dipke CJP Meeting: सीजेपी आंदोलनाची दिशा आज ठरणार; अभिजित दीपके यांच्या घरी कोअर कमिटीची बैठक
पूर्वपरवानगी आवश्यक
रील करण्याची हौस असलेल्या कर्मचाऱ्यांनी महामंडळाच्या प्रवासी सुविधा, योजना, स्वच्छता आणि अन्य उपक्रमांबाबत व्हिडीओ तयार करायचे असल्यास प्राधिकरणाची सक्षम पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक आहे, असेही परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे. पूर्वपरवानगीशिवाय रील तयार केल्यास शिस्तभंग नियमानुसार कारवाई करण्याचा इशारा महामंडळाने दिला आहे.
Shiv Sena Hearing : पक्षाच्या स्ट्रक्चरमध्ये विधीमंडळ पक्ष हा मोठा नाही, कपिल सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद
धावत्या लोकलमध्ये स्टंट; तरुण अटकेत
सोशल मीडियाद्वारे प्रसिद्धीसाठी धावत्या लोकलमध्ये स्टंटबाजी करणे तरुणाला भोवले आहे. धावत्या लोकलमध्ये स्टंट करून त्याचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर अपलोड केल्याप्रकरणी रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) मोहम्मद कुरेशी याला अटक केली आहे. कळवा रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक १वर धावत्या लोकलमधील दरवाजात उभे राहून स्टंटबाजी केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. याप्रकरणी ‘आरपीएफ’ने स्टंट करणाऱ्याचा शोध सुरू केला. रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने मोहम्मद कुरेशी (२२) याला मंगळवारी कळवा पूर्वेतून ताब्यात घेण्यात आले. इन्स्टाग्रामवर लाइक व फॉलोअर्स वाढवण्यासाठी त्याने २ ऑगस्ट रोजी कळवा स्थानकातील लोकलमध्ये स्टंट केला. ‘मित्राच्या मदतीने त्याचा व्हिडीओ शूट करून तो इन्स्टाग्रामवर अपलोड केला’, अशी कबुली कुरेशी याने ‘आरपीएफ’कडे दिली. त्याच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली. त्याला नोटीस बजावून बुधवारी कल्याण रेल्वे न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली.
