जंतरमंतरवरील आंदोलनाला मोठे समर्थन मिळाल्याने लोकांच्या अपेक्षा वाढल्या असून, देशभरात संघटन कसे वाढवायचे, आंदोलनाची पुढील दिशा काय असावी, यावर बैठकीत चर्चा होत असल्याचे त्यांनी सांगितले.
Tukaram Mundhe : नियमांनुसार काम करायचं नसेल तर राजीनामा देऊ शकतात, कर्मचाऱ्यांच्या तक्रारीवर तुकाराम मुंढे यांची भूमिका
शिक्षण, राजकारण, न्याय व्यवस्था, निवडणूक विभाग, बेरोजगारी, देशातील आर्थिक संकट, ई-२० आणि प्रसारमाध्यमे आदी विषयांवर बैठकीत चर्चा होणार आहे. बैठकीस सौरभ दास, आशुतोष रांका, वैष्णवी गौर, रत्ना सिंग, दीपक चौधरी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
झारखंडमध्ये भेट देणार
झारखंडमधील आंदोलक विद्यार्थ्यांना ‘सीजेपी’चा पूर्ण पाठिंबा असून, त्यांच्या आंदोलनात सहभागी होणार असल्याचेही दीपके यांनी सांगितले. सोनम वांगचुक हे मार्गदर्शक असून, प्रकृती ठीक नसल्याने ते बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत. यावेळी ‘नीट’ पेपरफुटीच्या नैराश्यातून आत्महत्या केलेल्या नांदेड येथील सुशील विलास घुगे या विद्यार्थ्याची आई शीतल घुगे यांनी दीपके यांची भेट घेतली. विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दीपके यांनी दिल्याचे त्यांनी सांगितले.
CJP राजकारणात उतरणार का? अभिजीत दीपके यांनी स्पष्टच सांगितलं; झारखंड आंदोलनावरही भूमिका जाहीर
‘त्या’ विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देऊ
या वेळी ‘नीट’ पेपरफुटीनंतर नैराश्यातून आत्महत्या केलेल्या नांदेड येथील सुशील विलास घुगे या विद्यार्थ्यांची आई शीतल घुगे यांनी दीपके यांची भेट घेतली. आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देऊ, असे आश्वासन अभिजित दीपके यांनी दिले, अशी माहिती घुगे यांनी पत्रकारांना दिली.
जंतरमंतरवरील आंदोलनाला मोठे समर्थन मिळाल्याने लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. देशभरात संघटन कसे वाढवायचे, आंदोलनाची पुढील दिशा काय असावी, यावर बैठकीत चर्चा झाली. –अभिजित दीपके, संस्थापक, सीजेपी
