Mumbai Crime : डोंबिवली येथील वडिलांचं घर गहाण ठेवलं होतं, मात्र नवं घर घेताना लाखोंची फसवणूक झाल्याने क्राइम पेट्रोल शोमध्ये पोलिसाची भूमिका साकारणारे अभिनेते सतीश नायकोडे यांनी ‘वय वर्ष 50, काय उरलं आयुष्यात, परत कसं उभं राहायचं?’ असा उद्विग्न सवाल विचारला
सतीश नायकोडे काय म्हणाले?
एक व्हिडिओ शेअर करत सतीश नायकोडे म्हणाले, की “घर घेण्याचं स्वप्न बाळगलं होतं, त्यासाठी वडिलांचं डोंबिवलीतलं घर एका प्रायव्हेट फायनान्स कंपनीकडे गहाण ठेवलं होतं. ते पैसे मी आस्था प्रॉपर्टीजच्या माध्यमातून घर घेण्यासाठी गुंतवले. तिथे असणारे सच्चिदानंद बामणे, अँग्नल परेरा, आकाश सोनी… सगळ्यांत यांचा मास्टरमाईंड म्हणजे शैलेश काकण. त्याचबरोबर त्यांचे दोन साथीदार म्हणजे अभिषेक गुजर आणि रुपेश बेळमकर. ही सगळी टोळी आहे आणि यांच्यावर नक्कीच कुणाचा तरी वरदहस्त आहे.”
Nagpur Crime : लग्नाचा तगादा, 29 वर्षीय प्रेयसीचा 9 मिनिटात काटा काढला, रेल्वे ट्रॅकमनने पोलिसांना सांगितलं, 18 तासात गजाआड
फसवणूक करणारी टोळी
नायकोडे पुढे म्हणाले की, “यांनी अनेक कुटुंबांची अशी फसवणूक केलेली आहे, की घर देतो असं सांगून पहिले एक नॉर्मल घर दाखवायचं. नंतर त्याचा व्यवहार होत नाही. एक मोठी रक्कम काढून घ्यायची आणि नंतर SRA चं घर दाखवायचं. साहजिकच चाळीत घर घेणाऱ्या माणसाला SRA चं घर दिसतंय, सोसायटीत दिसतंय, लिफ्ट असलेली बिल्डिंग मिळतेय तर लोक अजून पैसे देऊन पुढे सरसावतात. मग या लोकांनी सरकारी कागदपत्रं, SRA चे लेटरहेड, अधिकारांच्या सह्या, सरकारी शिक्के, स्वतः SRA ऑफिसमध्ये नेऊन केबिनमध्ये बसवून… मग समोर बसलेली व्यक्ती कोण होती, त्यांचं ID कार्ड तर आम्ही नाही मागू शकत ना, की आता SRA च्या बिल्डिंगमध्ये तुम्ही आहात. त्या केबिनमध्ये त्या टेबलवर आहात. समोर बसलेली व्यक्ती कोण आहे, असं कसं विचारणार? तुमचा आयडी दाखवता , असं नाही विचारणार. एवढं सगळं दिसतंय आणि मला वाटतं अशी यांची अजून चार दोन कुटुंब पण यांच्यासोबत असावीत की जे आमच्यासारख्या लोकांना हे भासवायचे की बघा आम्हाला घर मिळालंय. आमचे पेपर तयार झालेत. आमचे पेपर क्लिअर झालेत. आम्हाला अलॉटमेंट मिळतंय.”
“SRA हा मुद्दा नंतर आणायचा, पहिलं कुठेतरी नॉर्मल घर दाखवायचं. कारण काय SRA चे प्रॉब्लेम्स काय आहेत हे बऱ्याच लोकांना माहिती आहे. मग अशा लोकांना कसं गुंतवायचं? तर मग पैसे पहिले काढून घ्यायचे नॉर्मल घर दाखवून आणि मग तो व्यवहार होत नाहीये. आणि आता पैसे पण परत देऊ शकत नाही, तर निदान पैसे नाहीत, तर SRA चं घर घ्या आणि माणसाकडे काही पर्याय राहत नाही. मग ठीक आहे बाबा घर तर दे.” असं नायकोडे सांगतात.
Faridabad Teacher Murder : माजी विद्यार्थ्याची घाणेरडी मागणी, सरस्वती स्कूलच्या शिक्षिकेचा नकार, टीचरच्या खुनामागील रहस्याचा उलगडा; दोन मुलांच्या डोळ्यांना आईचा शोध
वय वर्ष पन्नास झालंय, परत कसं उभं राहायचं?
“आतापर्यंत माझे त्यांना दिलेले आहेत साडेचोवीस लाख. ज्याची साडेबावीस लाखाची व्हाईट एंट्री आहे. लोन घेऊन मी दिली आहे. त्या व्यतिरिक्त मी नऊ वर्ष हप्ता भरतोय त्यांना दिलेल्या पैशांचा. दर महिन्याला बेचाळीस ते पंचेचाळीस हजार रुपये हप्ता, सुरुवातीला पंचेचाळीस, आता बेचाळीस. साडेआठ वर्षांचा हिशोब साधारण ४४-४५ लाख रुपये. मी तर बँकेला देऊन बसलोय. शिवाय ज्या प्रॉपर्टीवरती लोन काढलंय त्याचं जर foreclose करायचंय तर अजून ३० लाख ५० हजार रुपये मला द्यायचे आहेत. ते बँकेला भरलेले जवळपास ४४-४५ लाख आणि यांना दिलेले २४ लाख. काय उरलं आयुष्यात आता? वय वर्ष पन्नास झालंय. परत कसं उभं राहायचं?” असा उद्विग्न सवाल नायकोडे यांनी विचारला.
