• Wed. Sep 16th, 2026
Maharashtra Live News 2nd August 2026 : महाराष्ट्रातील पावसाचे अपडेट्स आणि ताज्या घडामोडींच्या लाईव्ह बातम्या पाहा एकाच ठिकाणी

Government Job Scam : एक किंवा दोन नाही, तर तब्बल 117 जणांना सरकारी नोकरीचं स्वप्न दाखवलं, खोटी नियुक्तीपत्रे वाटली

विविध शासकीय विभागांमध्ये सरकारी नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवत 117 उमेदवारांकडून तब्बल 3 कोटी 73 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सुबायू सरकार उर्फ राणा (रा. वर्धमान, कोलकाता, पश्चिम बंगाल) आणि प्रमोद भगवान गुरव (रा. ज्योतिर्लिंग हौसिंग सोसायटी, सेक्टर क्र. ६, घणसोली, नवी मुंबई; मूळ रा. उंड, ता. कराड, जि. सातारा) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याबाबत रणजित हरीभाऊ मोढे (रा. सूर्यनगरी, बारामती) यांनी फिर्याद दाखल केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed