राज्यात सध्या एमईएमएस १०८ भागीदारी प्रकल्पांतर्गत सुमारे १,०७६ रुग्णवाहिका कार्यरत आहेत. याशिवाय खासगी रुग्णालये, धर्मादाय संस्था आणि स्वयंसेवी संस्थांच्या मिळून सुमारे ४,५०० ते ५,००० रुग्णवाहिका सेवा देत आहेत. मात्र, कोणती रुग्णवाहिका कुठे आहे, ती उपलब्ध आहे का, रुग्णापर्यंत किती वेळात पोहोचेल, कोणत्या सुविधांनी सुसज्ज आहे आणि दर किती आकारले जातील, याची एकसंध व विश्वासार्ह माहिती नागरिकांना उपलब्ध होत नाही. ही उणीव नव्या धोरणातून दूर करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
Raj Thackeray: दरवर्षी अठरा कोटींची दानचोरी; सिद्धिविनायक मंदिराबाबत राज ठाकरेंचा गंभीर आरोप
प्रस्तावित व्यवस्थेत नागरिक, रुग्णवाहिका चालक, रुग्णवाहिकेतील टॅब तसेच, आरटीओ आणि आरोग्य विभागासाठी स्वतंत्र डिजिटल प्रणाली विकसित करण्याचा विचार आहे. या प्रणाली एकमेकांशी जोडल्या जाणार असून, नागरिकांना जवळची उपलब्ध रुग्णवाहिका शोधणे, तिचे अचूक स्थान पाहणे, अंदाजित पोहोचण्याची वेळ आणि भाडे जाणून घेणे शक्य होणार आहे. आपत्कालीन परिस्थितीत व्हिडिओ कॉलद्वारे प्राथमिक वैद्यकीय मार्गदर्शन मिळण्याची सुविधाही प्रस्तावित आहे.
रुग्णवाहिकेतील टॅबलेटवर रुग्णाची प्राथमिक माहिती, महत्त्वाची लक्षणे, उपचारांची नोंद, रुग्णालयाशी व्हिडीओ संपर्क आणि ऑक्सिजन-सक्शनसारख्या उपकरणांची तपासणी नोंदवता येईल. आरटीओ आणि आरोग्य विभागाच्या डॅशबोर्डवर प्रत्येक नोंदणीकृत रुग्णवाहिकेचे स्थान, स्थिती, प्रतिसाद वेळ, चालकनिहाय कामगिरी, वारंवार कॉल नाकारणाऱ्या चालकांची माहिती तसेच गैरवापराच्या संशयास्पद घटनांची नोंद उपलब्ध होणार आहे. त्यामुळे धोरणातील नियमांची प्रभावी अंमलबजावणी करणे शक्य होईल.
Amit Thackeray : तुमच्या उत्साहामुळे मी विसरलो, खरंच सुचत नाहीये, अमित ठाकरे अर्ध्या भाषणातून उतरले, परत येताच जोशाने बोलले
विद्यमान खासगी रुग्णवाहिकांचे दर अनेकदा स्पष्टपणे जाहीर नसल्याने आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांच्या नातेवाइकांना आर्थिक फटका बसतो. नव्या धोरणात नोंदणीकृत प्रत्येक रुग्णवाहिकेने ॲपवर दरपत्रक प्रसिद्ध करणे बंधनकारक करण्याचा विचार आहे.
