Chhatrapati Sambhajinagar Crime: घटनेची माहिती मिळताच सिटी चौक पोलीस ठाण्याचे पथक आणि फॉरेन्सिक टीम तातडीने घटनास्थळी पोहोचली. फॉरेन्सिक टीमने घटनास्थळावरून तांत्रिक पुरावे जप्त केले आहेत.
तरुणाला बोलावून घेतलं अन् क्रूरपणे संपवलं(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
छत्रपती संभाजीनगर: शहरातील रोजेबाग परिसरात ऐन मध्यरात्रीच्या सुमारास एका तरुणाची धारदार शस्त्रांनी वार करून हत्या करण्यात आल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. जुना वाद कायमचा संपवून मार्ग काढू, असा बनाव रचून एका २१ वर्षीय तरुणाला बोलावण्यात आले आणि तिथेच दबा धरून बसलेल्या टोळक्याने त्याच्यावर खुनी हल्ला चढवला. या हल्ल्यात तरुणाचा जागीच दुर्दैवी अंत झाला आहे.
खान नासिर खान तारेख अहमद (वय २१, रा. शाह बाजार) असे खून करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. नासिर याचे काही स्थानिक तरुणांसोबत पूर्वीपासूनच किरकोळ कारणांवरून भांडण चालू होते. हेच जुने वैर मनात ठेवून समोरच्या गटाने नासिरला रोजेबाग भागात भेटायला बोलावले. नासिर वाद संपण्याच्या आशेने तिथे गेला, परंतु तेथे आधीच शस्त्रांसह हल्ल्याची तयारी करून आलेल्या टोळक्याने त्याला गाठले.
दरम्यान या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे आठ जणांच्या टोळक्याने नासिरला चारही बाजूंनी घेरले. आधी लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण करत त्याला खाली पाडले आणि त्यानंतर अत्यंत क्रूरपणे त्याच्यावर चाकूने अनेक वार केले. या हल्ल्यात नासिर रक्ताच्या थारोळ्यात पडला.
माजी नगरसेवकाच्या मुलावर संशयाची सुई; ७ जणांना ठोकल्या बेड्या
घटनेचे गांभीर्य ओळखून सिटी चौक पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली आणि हत्येत सामील असलेल्या ८ पैकी ७ संशयितांना तात्काळ ताब्यात घेतले. एका फरार आरोपीचा शोध सुरू आहे. या संपूर्ण हत्येमागे शहरातील एका माजी नगरसेवकाच्या मुलाचा मुख्य हात असल्याचा धक्कादायक आरोप मयत नासिरच्या भावाने केला आहे. या घटनेनंतर रोजेबाग आणि शाह बाजार परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांचा मोठा ताफा तैनात करण्यात आला आहे. पोलीस सध्या अटकेतील आरोपींची कसून चौकशी करत आहेत.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा