Nanded Hotel Kavita and Savera License Suspended : अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढेंनी राज्यात कारवाईचा धडाका सुरु आहे. अशातच नांदेड जिल्ह्यामधील दोन हॉटेल्सचा परवाना निलंबित केला आहे.
अस्वच्छता आणि गंभीर त्रुटी
तुकाराम मुंडे यांनी अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्त पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर राज्यभरात कारवाईचा धडाका सुरु आहे. एफडीएच्या पथकाकडून हॉटेल, उपहारगृह, खाद्यगृह तसेच विविध अन्न आस्थापनांची व्यापक तपासणी केली जात आहे. भेसळ खाद्य पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर कारवाई देखील केली जात आहे. या तपासणी मोहिमेदरम्यान नांदेड शहरातील देगलूर नाका परिसरात असलेल्या हॉटेल सवेरा या हॉटेलमध्ये अस्वच्छता आणि गंभीर त्रुटी पथकाला आढळून आल्या. हॉटेल सवेरा ही चिकन- मटण बिर्याणीसाठी प्रसिद्ध असल्याची माहिती आहे.
Chandrakant Patil : आंबा चोरला म्हणून फाशी नसते, ‘नीट’ पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरु कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेसची टीका
खिचडीमध्ये जिवंत अळी
गंभीर त्रुटी आढळून आल्यानं संबंधित आस्थापनेचा अन्न परवाना पुढील आदेशापर्यंत तात्काळ निलंबित करण्यात आला आहे. तसेच खिचडी भज्जेसाठी प्रसिद्ध असलेल्या हॉटेल कविता या आस्थापनेचाही अन्न परवाना गंभीर अनियमिततेमुळे निलंबित करण्यात आल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनानं दिली आहे. विशेष म्हणजे कविता हॉटेलमध्ये काही दिवसापूर्वी खिचडीमध्ये जिवंत अळी आढळली होती. सोशल मीडियावर व्हिडीओ देखील व्हायरल झाला होता. त्यानुसार एफडीएनं हॉटेलचा परवाना रद्द केला आहे. याशिवाय अन्य एका हॉटेलमध्ये बिर्याणीत मृत माशी आढळून आल्याची ऑनलाईन तक्रार ग्राहकानं केली होती, त्यानुसार पथकाने हॉटेलची तपासणी केली. तपासणीसाठी नमुने देखील घेतले. अहवाल आल्यानंतर या हॉटेलवर कारवाई केली जाणार असल्याची माहिती संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
रिफाइंड सोयाबीन तेलाचा साठाही जप्त
याशिवाय ताडी दुकान क्रमांक 12, नवा मोंढा, नांदेड येथून 158 लिटर साठा (किंमत 7 हजार 110 रुपये) जप्त करून नष्ट करण्यात आला. संबंधित व्यावसायिकाकडे खरेदी बिल अथवा वाहतूक परवाना (ट्रान्सपोर्ट पास) उपलब्ध नसल्याने आणि गंभीर त्रुटी आढळल्यामुळे या आस्थापनेचाही अन्न परवाना तत्काळ निलंबित करण्यात आला. मोहिमेदरम्यान विविध औद्योगिक आस्थापनांमधून मोठ्या प्रमाणात रिफाइंड सोयाबीन तेलाचा साठाही जप्त करण्यात आला.
Maharashtra Weather: कोकणात मुसळधार पावसाने झोडपलं, मराठवाडा-विदर्भात पावसाची प्रतीक्षा; येत्या दोन आठवड्यांत कसं असेल हवामान?
त्यामध्ये श्री स्वामी समर्थ ऑईल ट्रेडिंग, एमआयडीसी, नांदेड येथून 3 हजार 148 लिटर (किंमत 5 लाख 19 हजार 420 रुपये), श्रीनिवास ऑईल अँड फूड्स, हदगाव येथून 1 हजार 363 लिटर (किंमत 2 लाख 45 हजार 340 रुपये), ज्ञानाई स्पाईसेस, कृष्णूर एमआयडीसी, नायगाव येथून 1 हजार 61 लिटर (किंमत 3 लाख 53 हजार 800 रुपये) तसेच आयुष ओमकार इंडस्ट्रीज, एमआयडीसी, नांदेड येथून 1 हजार 78 किलोग्रॅम रिफाइंड सोयाबीन तेल (किंमत 1 लाख 86 हजार 494 रुपये) जप्त करण्यात आले.
अन्न व औषध प्रशासनाचा इशारा
नांदेड शहर व जिल्ह्यातील सर्व हॉटेल, उपहारगृह, खाद्यगृह आणि अन्न सेवा आस्थापनांनी अन्न सुरक्षा व मानके कायदा, 2006 तसेच संबंधित नियमांचे काटेकोर पालन करावे, अन्यथा कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा अन्न व औषध प्रशासनाने दिला आहे.
