मुंबई, दि. १२ : महामहिम प्रिन्स रहीम आगा खान आणि त्यांच्या शिष्टमंडळाचे आज दुपारी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे आगमन झाले. राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.

यावेळी राज्याचे मुख्य राजशिष्टाचार अधिकारी तथा सचिव डॉ. राजेश गवांडे, मुंबईचे अतिरिक्त पोलीस आयुक्त अभिनव देशमुख, मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्यासह संबंधित अधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.त्यानंतर महामहिम प्रिन्स रहीम आगा खान आणि त्यांच्या शिष्टमंडळाने पुढील कार्यक्रमासाठी प्रयाण केले.

०००