• Sat. Jul 25th, 2026

    सर्वांना निरोगी आयुष्य दे… बळीराजासाठी चांगला पाऊस पडू दे – विठुराया चरणी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी घातलं साकडं – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Jul 25, 2026
    सर्वांना निरोगी आयुष्य दे… बळीराजासाठी चांगला पाऊस पडू दे – विठुराया चरणी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी घातलं साकडं – महासंवाद

    प्रतापरावांची विठ्ठलाचरणी ४३ वी वारी समर्पित

    सोलापूर, दि. २५ : सुंदर ते ध्यान उभे विटेवरी । कर कटावरी ठेवूनियां ।। विठुरायाच्या चरणी  केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव  नतमस्तक होऊन  सर्वांना चांगल आयुष्य ,आरोग्य लाभो आणि बळीराजासाठी चांगला पाऊस पडू दे… सर्वांना निरोगी आरोग्यदायी जिवन मिळु दे … असं साकडं विठूराया चरणी घातलं.

    आषाढी एकादशी निमित्त दरवर्षी लाखो भाविक व वारकरी दिंड्या श्री क्षेत्र पंढरपूर येथे जाऊन विठूराया चरणी नतमस्तक होतात. डोळ्याचं पारणं फेडणाऱ्या भक्तीमय सोहळ्यासाठी राज्यातील कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी विठ्ठल नगरीत विठ्ठला चरणी नतमस्तक होण्यासाठी एकवटतात. आषाढी एकादशी निमित्त केंद्रीय आयुष (स्वतंत्र प्रभार) तथा आरोग्य कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव  जाधव यांनी श्री पांडुरंगाचे मनोभावे दर्शन घेतले. देशातील प्रत्येक नागरिकाला चांगले निरोगी आयुष्य मिळू दे… अन्नधान्य पुरवणाऱ्या बळीराजासाठी दमदार पाऊस होऊ दे… असे साकडेही त्‍यांनी विठुराया चरणी घातले.

    केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांची विठूराया चरणी सलग 43 वी वारी …

    देशाचे केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव हे विठुरायाचे परमभक्त आहेत. कोरोनाचा दोन वर्षाचा कार्यकाळ सोडला तर गेल्या 43 वर्षापासून ते आषाढी एकादशीला नियमितपणे विठू चरणी नतमस्तक होण्यासाठी जात असतात.. प्रत्येक भारतीयांना निरोगी आयुष्य लाभू दे… बळीराजाला सुखी ठेव… चांगला पाऊस पडू दे.. असं साकडं  त्यांनी आपली 43 वी वारी पूर्ण करताना विठ्ठल चरणी घातलं …

    विठुरायाच्या पंढरीत आयुर्वेदिक उपचार पद्धतीने केली जातेय वारकऱ्यांची सेवा

    आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल रुखमार्ईच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी आलेल्या वारकऱ्यांना आयुष सेवा सुविधा केद्रामार्फत पारंपरिक आयुर्वेदिक उपचार पद्धतीने आरोग्यदायी सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. या आयुष सेवा सुविधा केंद्रावर वारकऱ्यांना आयुवैदीक, होमिओपॅथी औषध वाटप, योगाबाबत मार्गदर्शन, स्नेहन – स्वेदन (वाफ देणे ) वारकऱ्यांसाठी तेल – मसाज, विद्ध – कर्म, अग्नी – कर्म, चरण सेवा करण्यात येत आहे.

    ०००

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed