• Thu. Jul 23rd, 2026
    Mumbai Police: यह फंस गया! मुंबईत दोन तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं, कॅमेरा सुरू असल्याचं कळलंच नाही अन् सगळा खेळ उघड

    मुंबई: दिल्लीतील जंतरमंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा आणि २० जुलै रोजी झालेल्या पोलिस कारवाईच्या निषेधार्थ बुधवारी मुंबईतही तरुणाई पुन्हा एकदा रस्त्यावर उतरली. मुसळधार पावसाची तमा न बाळगता दादर येथील शिवाजी पार्क आणि चेंबूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान परिसरात शेकडो विद्यार्थी, तरुण आणि विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते एकत्र आले. हातात निषेधाचे फलक, गुलाबाची फुले आणि चॉकलेट घेऊन त्यांनी शांततापूर्ण आंदोलन करत केंद्र सरकार आणि पोलिस कारवाईविरोधात आवाज उठवला. मात्र जमावबंदीच्या आदेशानंतरही तरुणाई उत्स्फूर्तपणे रस्त्यावर उतरत असल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. अशातच आंदोलकांना वैतागलेल्या पोलिसांनी विद्यार्थ्यांना ताब्यात घेतल्यानंतर खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे.

    व्हायरल व्हिडिओनुसार, मुंबई पोलिसांनी दोन विद्यार्थ्यांना ताब्यात घेऊन आपल्या वाहनात बसवलं होतं. त्यानंतर समोरच्या सीटवर बसलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने सदर विद्यार्थ्यांना धमकी देण्यास सुरुवात केली. या विद्यार्थ्यांनी आपल्या फोनचा कॅमेरा सुरू करून हा सगळा प्रकार चित्रित केला आहे. यामध्ये पोलीस कर्मचारी म्हणताना दिसत आहे की, “परत जर या परिसरात दिसला तर माझ्यासारखा बेकार माणूस नाही. नाहीतर मी खिशात ५०-५० ग्रॅम पावडर टाकेन. मग जामीनही मिळणार नाही. तुम्हा लोकांमुळे सध्या आम्हाला त्रास होत आहे.”

    दरम्यान, पोलीस कर्मचाऱ्याने आंदोलक विद्यार्थ्यांना थेट खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिल्याचं या व्हिडिओत दिसत असल्याने पोलिसांच्या कारभाराबाबत संताप व्यक्त केला जात आहे. मुंबई पोलिसांकडून या व्हिडिओबाबत अद्याप स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही. ‘मटा ऑनलाइन’ या व्हिडिओच्या सत्यतेची पुष्टी करत नाही.

    मुंबईत तरुणांनी उडवली पोलिसांची झोप

    दिल्लीतील घटनेनंतर देशभरात आंदोलनाची व्याप्ती वाढत असून मुंबई त्याला अपवाद ठरली नाही. गेल्या दोन दिवसांपासून दादर परिसरात आंदोलने होत असून, यापूर्वी पोलिसांनी अनेक आंदोलकांना ताब्यात घेतले होते. त्यामुळे बुधवारीही दादर आणि चेंबूर परिसरात पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला. मात्र, त्यानंतरही आंदोलकांनी शांततेच्या मार्गाने आपली भूमिका मांडली.

    या आंदोलनाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यातील प्रतीकात्मकता. घोषणाबाजीसोबत अनेक तरुणांच्या हातात गुलाबाची फुले आणि चॉकलेट दिसत होते. संताप व्यक्त करतानाही संवाद, अहिंसा आणि लोकशाही मूल्यांवर विश्वास असल्याचा संदेश या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. अनेकांनी संविधानाच्या प्रस्तावनेच्या प्रती हातात घेतल्या होत्या, तर काहींनी शिक्षणव्यवस्था, परीक्षांमधील पारदर्शकता आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर फलक झळकवले. ‘आम्हाला भ्रष्ट शिक्षण व्यवस्थेतून स्वातंत्र्य हवे’, ‘वी वाँट जस्टिस’, ‘विद्यार्थ्यांचा आवाज दाबू नका’, ‘लोकशाही वाचवा’ अशा घोषणा देत आंदोलनकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला.

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

    पत्रकारितेतील अनुभव
    अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

    मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

    शैक्षणिक पात्रता
    अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed