सर्व आंतरराष्ट्रीय निकष पूर्ण करीत २५ हजार ५०० सागरी मैल अंतर कापत आणि असंख्य आव्हाने झेलत मोहीम यशस्वी करणाऱ्या भूदल, नौदल आणि हवाई दलातील नऊ अधिकाऱ्यांसाठी बुधवारी ‘गेटवे ऑफ इंडिया’ येथे खास समारंभ झाला. त्यात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी होत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी या अधिकाऱ्यांच्या धैर्याचे कौतुक केले.
Ganeshotsav 2026: वायुप्रदूषण नियमांचं काय? मुंबई उच्च न्यायालयाचा ‘पीओपी मूर्ती’ समर्थकांना प्रश्न
गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात आयएएसव्ही त्रिवेणी या नौकेसह भूदल, नौदल आणि हवाई दल या तिन्ही दलांतील महिला अधिकाऱ्यांचा चमू जागतिक सागरी प्रदक्षिणेसाठी मुंबईहून निघाला होता.
‘आता अनेक अत्याधुनिक संपर्कयंत्रणा आल्या आहेत. तरीही समुद्रात असताना तुम्ही जगापासून तुटलेले असता. अथांग समुद्र तुम्हाला खूप काही शिकवतो. ५० फुटांच्या नौकेत तुमच्या पाच-सहा सहकाऱ्यांसह राहताना तुम्हाला एकमेकींना सांभाळून घ्यावे लागते, तुम्ही एक कुटुंबच बनता,’ असे या मोहिमेचे नेतृत्व करणारया लेफ्टनंट कर्नल अनुजा वरूडकर यांनी सांगितले.
Divija Fadnavis : सोशल मीडिया ट्रेण्डचं आंधळं समर्थन करु नका, मुख्यमंत्री फडणवीसांच्या लेकीची CJP आंदोलनावर पहिली प्रतिक्रिया
आता अनेक अत्याधुनिक संपर्कयंत्रणा आल्या आहेत. तरीही समुद्रात असताना तुम्ही जगापासून तुटलेले असता. अथांग समुद्र तुम्हाला खूप काही शिकवतो. ५० फुटांच्या नौकेत तुमच्या पाच-सहा सहकाऱ्यांसह राहताना तुम्हाला एकमेकींना सांभाळून घ्यावे लागते, तुम्ही एक कुटुंबच बनता,’ असेही त्या म्हणाल्या.
या मोहिमेत लेफ्टनंट कर्नल अनुजा वरूडकर यांच्यासह मेजर करमजीत कौर, मेजर ओमिता दळवी, मेजर प्राजक्ता निकम या भूदलातील आणि स्क्वाड्रन लीडर श्रद्धा पी. राजू, विंग कमांडर विभा सिंह, स्क्वाडून लीडर वैशाली भंडारी, स्क्वाड्रन लीडर आरूवी जयदेव या हवाई दलातील अधिकाऱ्यांसह नौदलातील लेफ्टनंट कमांडर प्रियांका गुसैन यांचा समावेश होता.
ही मोहीम यशस्वी होण्यासाठी सुमारे दोन वर्षांचे कठोर प्रशिक्षण, अत्यंत बारकाईने केलेले नियोजन, २४ तास कार्यरत असलेली किनारपट्टीवरील साह्य व्यवस्था तसेच अनेक संस्था आणि सहकार्य करणाऱ्या यंत्रणांची अविरत साथ महत्त्वाची ठरली. जागतिक सागरी प्रदक्षिणेसाठी आवश्यक असलेले सर्व आंतरराष्ट्रीय निकष या मोहिमेने पूर्ण केले. त्यामध्ये पृथ्वीवरील सर्व रेखांश ओलांडणे, विषुववृत्त दोन वेळा पार करणे, आंतरराष्ट्रीय दिनरेषा पार करणे तसेच केप ल्यूविन, केप हॉर्न आणि केप ऑफ गुड होप या तीन महान भूशिरांना वळसा घालणे यांचा समावेश होता.
Farmer Loan Waiver 2026 : बळीराजासाठी सुखकर बातमी! कर्जमुक्तीला अखेर सुरुवात, लाभार्थींची प्रातिनिधिक यादी जाहीर; किती लाख जमा होणार?
समन्वयामुळे क्षमता अनेक पटीने वाढते आणि तिन्ही दले एकत्र वाटचाल करतात, तेव्हा विजयाचा मार्ग निर्माण होतो,’ असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले.
एकाच ध्वजाखाली, एकाच निर्धाराने आणि एकाच उद्दिष्टासाठी एकत्र आलेल्या तिन्ही दलांतील महिला अधिकाऱ्यांची, भारताची एकात्मता जगासमोर मांडणारी ही ऐतिहासिक मोहीम म्हणून स्मरणात राहील. – राजनाथ सिंह, संरक्षणमंत्री
