• Thu. Jul 23rd, 2026
    Pune RTO: वाहतुकीला शिस्त लागेल का? वाहतूक शाखेत फेरबदल, कोंडी सुटणार की अधिकारी बदलीपुरतेच राहणार?

    म. टा. प्रतिनिधी, पुणे: पुणे शहरातील वाहतूक कोंडी, बेशिस्त वाहनचालक, अतिक्रमणे आणि नियमभंगाच्या वाढत्या घटनांमुळे वाहतूक व्यवस्था दिवसेंदिवस विस्कळित होत असताना शहर पोलिस आयुक्तालयाने वाहतूक शाखेतील अधिकाऱ्यांच्या तात्पुरत्या पदस्थापना केल्या आहेत. .

    एकूण ३३ वाहतूक विभाग
    शहरात लोणी काळभोर, लोणीकंद आणि काळेपडळ हे नवे वाहतूक विभाग सुरू करण्यात आले असून, त्यानंतर आता शहरात एकूण ३३ वाहतूक विभाग कार्यरत झाले आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वच्या सर्व ३३ विभागांमध्ये प्रभारी, सहायक प्रभारी आणि इतर अधिकाऱ्यांच्या पदस्थापना नव्याने करण्यात आल्या आहेत. पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांच्या आदेशानुसार सोमवारी (२० जुलै) हा फेरबदल करण्यात आला असून, संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने नवीन पदस्थापनेच्या ठिकाणी कार्यभार स्वीकारण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मात्र, शहरासमोरील वाहतुकीची आव्हाने केवळ अधिकारी बदलून संपणारी नाहीत.

    Ajit Pawar’s Birth Anniversary:राज्यभरात अजितदादांच्या जयंतीनिमित्त ‘जनसेवा सप्ताहाचे’ आयोजन;आरोग्य शिबिर, वृक्षारोपणासह शेतकऱ्यांचा विशेष सन्मान
    पायाभूत सुविधांचा अभाव
    पुण्यात वाहनांची संख्या झपाट्याने वाढत असताना रस्त्यांचे जाळे आणि पायाभूत सुविधा त्याच वेगाने विकसित झालेल्या नाहीत. प्रमुख चौकांतील वाहतूक कोंडी, सिग्नलचे उल्लंघन, बेशिस्त पार्किंग, फेरीवाल्यांचे अतिक्रमण, रिक्षा आणि पीएमपी बसथांब्यांवरील गोंधळ, अरुंद रस्त्यांवरील वाढता ताण यामुळे दररोज लाखो नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. याशिवाय अनेक चौकांमध्ये वाहतूक पोलिसांची अपुरी संख्या, सिग्नल यंत्रणांतील बिघाड, रस्त्यावरील खड्डे, सुरू असलेली विकासकामे आणि नियमभंग करणाऱ्यांवर सातत्यपूर्ण कारवाईचा अभाव या कारणांमुळे वाहतूक व्यवस्थेवर अतिरिक्त ताण निर्माण होत आहे.

    पदस्थापनांमुळे प्रशासनाला नवी दिशा मिळू शकते. मात्र, त्याचे यश केवळ बदललेल्या अधिकाऱ्यांवर अवलंबून नसून, प्रभावी नियोजन, पुरेसे मनुष्यबळ, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि सातत्यपूर्ण अंमलबजावणी यावरही अवलंबून आहे. त्यामुळे या फेरबदलानंतर पुणेकरांना वाहतूक कोंडीतून खरोखर दिलासा मिळतो, की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

    Maharashtra TimesSunetra Pawar : तुमचं प्रेम माझ्या प्रत्येक श्वासात जिवंत राहील, अजितदादांच्या जयंतीला सुनेत्रा पवार भावूक, अश्रू थांबायचं नाव घेईनात
    नवीन उपायुक्तांपुढील आव्हाने
    शहर वाहतूक पोलिस शाखेत डॉ. संदीप भाजीभाकरे यांची अलीकडेच नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी त्यांनी मुख्यालय आणि विशेष शाखेचे काम पाहिले आहे. त्यामुळे वाहतूक शाखेची नवीन जबाबदारी सांभाळताना त्यांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. स्थानिक पातळीवरील समस्यांचा अभ्यास करून त्यानुसार उपाययोजना राबविणे, वाहतूक पोलिसांची उपस्थिती वाढविणे, कोंडीच्या ठिकाणी तत्काळ नियोजन करणे आणि नियमभंगावर कठोर कारवाई करणे ही नव्या अधिकाऱ्यांसमोरील प्रमुख आव्हाने असतील.

    पोलिस आयुक्तांना विनंती करून वाहतूक शाखेसाठी अतिरिक्त अधिकारी घेतले आहेत. सध्या पावसामुळे पाणी साचणे आणि खड्डे हे दोन मोठे प्रश्न आहेत. महापालिकेच्या समन्वयाने त्याच्यावर मात करण्याचा प्रयत्न आहे. – डॉ. संदीप भाजीभाकरे, पोलिस उपायुक्त, वाहतूक शाखा

    Maharashtra TimesKetan Agarwal : सिया-चेतन दोन तास जपानी व्हिडिओ पाहत बसलेले, तपासात लिंक सापडली, कंटेंट पाहून पोलिसांचा डोक्याला हात
    वाहतूक पोलिसांपुढील आव्हाने
    सिग्नलचे उल्लंघन
    बेशिस्त पार्किंग, दुहेरी पार्किंग
    फेरीवाल्यांचे अतिक्रमण
    रिक्षा आणि पीएमपी बसथांब्यांवरील गोंधळ
    अरुंद रस्त्यांवरील वाढता ताण
    पोलिसांची अपुरी संख्या
    रस्त्यावरील खड्डे

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed