• Wed. Jul 22nd, 2026
    ड्युटी संपली, तरी माणूसकीचं कर्तव्य निभावलं; वाहतूक पोलिसांचा बेशुद्ध कारचालकाला CPR, तत्परतेमुळे प्राण वाचले

    Navi Mumbai Traffic Police saves Car Driver : दोन्ही पोलिसांनी तात्काळ कार चालक सचिन बिचुकले यांना सीपीआर दिल्यामुळे काही क्षणांतच त्यांना शुद्ध आली. दुसऱ्या दिवशी कृतज्ञता व्यक्त करताना बिचुकले म्हणाले की ‘पोलिसांनी योग्य वेळी मदत केली नसती, तर आज मी जिवंत नसतो. त्यांच्या तत्परतेमुळे माझे प्राण वाचले’

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई : कर्तव्याची वेळ संपल्यानंतरही माणुसकीचे कर्तव्य पार पाडत रबाळे वाहतूक शाखेतील दोन पोलिस शिपायांनी प्रसंगावधान दाखवत बेशुद्ध गाडी चालकाचे प्राण वाचविल्याची हृदयस्पर्शी घटना घडली आहे. त्यांच्या या धाडसी आणि तत्पर कृतीबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे कौतुक होत आहे.

    गाडी दुभाजकाला आदळलेली, चालक बेशुद्ध

    १७ जुलै २०२६ रोजी रात्री सुमारे १०.३० वाजण्याच्या सुमारास रबाळे वाहतूक शाखेचे पोलिस शिपाई सचिन ढाले आणि सचिन सुळ हे दोघे त्यांचे नियमित कर्तव्य पूर्ण करून घरी जात होते. त्यावेळी रबाळे येथील रिलायन्स उड्डाणपुलाच्या बेलापूर लेनवर सुरुवातीलाच ५० मीटर अंतरावर एक गाडी दुभाजकावर आदळलेल्या अवस्थेत दिसून आली. त्यामुळे दोन्ही पोलिस अंमलदारानी तत्काळ गाडीजवळ जाऊन पाहणी केली असता चालक बेशुद्धावस्थेत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
    Maharashtra TimesCrime News : ‘अतुलची बायको’ हातावर नवऱ्याच्या नावाचा टॅटू, मात्र त्याचाच जीव घेतला; स्कूलबस चालक प्रियकरासह अटक, शेजारी चकित

    चालकाला सीपीआर देत शुद्धीवर आणलं

    परिस्थितीचे गांभीर्य ओळखून दोन्ही पोलिसांनी तात्काळ त्या चालकाला सीपीआर दिल्यामुळे काही क्षणांतच चालकाला शुद्ध आली. यानंतर त्यांनी तातडीने चालकाला रबाळे येथील गवळी रुग्णालयामध्ये दाखल केले. उपचारादरम्यान चालकाने स्वतःचे नाव सचिन बिचुकले असल्याचे तसेच, ते सानपाड्यात राहात असल्याचे सांगितले. बिचुकले हे वसई येथे लार्सन ॲन्ड टुब्रो कंपनीत नोकरीला असून या दिवशी ते ऑफिस वरून सानपाडा येथील घरी जात असताना, हा प्रकार घडला. त्याचवेळी त्यांच्या मोबाइलवर पत्नी अंजली बिचुकले यांचा फोन आला असता, पोलिसांनी त्यांना घडलेला प्रकार सांगितला.

    Dipake’s Mother | एखादा विद्यार्थ्याचा मृत्यू झाला की सरकार दखल घेईल, दिपकेंच्या आईचा आक्रोश

    रुग्णालयात जाऊनही विचारपूस

    दुसऱ्या दिवशी, १८ जुलै रोजी, पोलिसांनी रुग्णालयात जाऊन बिचुकले यांची विचारपूस केली असता त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समोर आले. यावेळी सचिन यांनी, ‘दोन्ही पोलिसांनी योग्य वेळी मदत केली नसती, तर आज मी जिवंत नसतो. त्यांच्या तत्परतेमुळे माझे प्राण वाचले,’ अशा शब्दांत कृतज्ञता व्यक्त करत त्यांचे आभार मानले.
    Maharashtra TimesUday Krishna Reddy : माझी सॉलिड इच्छा होतेय रे… रुममध्ये शिरुन जबरदस्ती किस, मी तिच्या नवऱ्याला व्हिडिओ पाठवला; प्रशिक्षणार्थी IPS च्या चिठ्ठीने खळबळ
    ‘रबाळे वाहतूक शाखेतील पोलिस शिपाई सचिन ढाले आणि सचिन सुळ यांनी दाखवलेले प्रसंगावधान, तत्परता आणि माणुसकी हे संपूर्ण पोलिस दलासाठी अभिमानास्पद आहे. कर्तव्य संपल्यानंतरही त्यांनी एका अनोळखी नागरिकाचा जीव वाचविण्यासाठी क्षणाचाही विलंब न करता मदतीचा हात पुढे केला. नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि सेवेसाठी आमचे कर्मचारी २४ तास सज्ज आहेत,’ असे रबाळे वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन बडगुजर यांनी सांगितले.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

    पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

    अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

    शैक्षणिक पात्रता
    अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा