Kalyan Crime: पोलिसांनी सदर फ्लॅटची पाहणी केली असता बाथरूममध्ये गोणीत ठेवलेला तरुणाचा मृतदेह आढळून आला.
महिलेनं प्रियकराला संपवलं, बॉडी गोणीत भरला अन् बाथरूमचा नळ सुरू ठेवला; रूमवर पोहोचताच पोलीसही चक्रावले(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
कल्याण : कल्याणमधील मलंग रोड परिसरातील नीलकंठ सोसायटीमधील एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका महिलेने प्रियकराची हत्या करून त्याचा मृतदेह पोत्यात भरून बाथरूममध्ये लपवल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणात तरुणाची हत्या केल्यानंतर आरोपी महिलेने मृतदेह लवकर कुजावा व रक्तासह इतर महत्त्वाचे पुरावे नष्ट व्हावे म्हणून बाथरूमचा नळ सलग सुरू ठेवला असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मलंग रोड परिसरातील नीलकंठ सोसायटीमध्ये घडलेल्या या घटनेनं संपूर्ण परिसर हादरून गेला आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून फ्लॅट क्रमांक १०४ मधून पाणी बाहेर येत असल्याची तक्रार इमारतीतील रहिवाशांनी घरमालक अजय पाटील यांच्याकडे केली होती. यानंतर पाटील यांनी भाडेकरूंसोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना प्रतिसाद मिळत नसल्यामुळे संशय अधिक वाढला.
महिलेकडून घरमालकाला व्हॉइस मेसेज
घरमालक अजय पाटील यांना संशयित महिलेकडून नुकताच एक व्हॉइस मेसेज प्राप्त झाला. या मेसेजमध्ये सदर महिलेने आपल्या प्रियकराचा खून केल्याची माहिती देत मृतदेह बाथरूममध्ये असल्याचं सांगितल्याचा दावा करण्यात आला आहे. हा व्हॉइस मेसेज प्राप्त होताच घरमालकाने तातडीने मानपाडा पोलीस ठाण्यात धाव घेत पोलिसांना माहिती दिली. या तक्रारीनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. प्राथमिक तपासात मृताच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आल्याचं आढळून आळं आहे. तसंच बाथमरूमचा नळ सुरू असल्याचं दिसून आलं. रक्ताचे डाग आणि इतर पुरावे नष्ट करण्यासाठीच महिलेने बाथरूमचा नळ सुरू ठेवण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे.
संशयित महिला कोलकात्याला निघून गेली!
हत्येनंतर संशयित महिला कोलकात्याला गेल्याची प्राथमिक माहिती तपासात समोर आली असून तिचा शोध घेण्यासाठी तीन विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. तरुणाच्या हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालं नसून मानपाडा पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. या हत्येमागे नेमकं कोणतं कारण आहे, याचा शोध पोलीस घेत असून या भयंकर हत्याकांडामुळे कल्याण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा