Navi Mumbai News : रुग्णालयात आणले त्यावेळी माधुरीच्या हृदयाचे ठोके बंद पडले होते, मात्र डॉक्टरांनी अथक प्रयत्न करून ३० मिनिटांच्या सीपीआरनंतर तिचे रक्ताभिसरण पुन्हा सुरू केले.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई : आपल्या तरुण मुलीच्या अचानक जाण्याने कोसळलेला दुःखाचा डोंगर बाजूला सारुन, एका पित्याने आणि त्यांच्या परिवाराने अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे गंभीर अवस्थेतील तीन रुग्णांना नवे आयुष्य मिळाले आहे. डॉक्टरांनी मृत तरुणीचे हृदय, यकृत (लिव्हर) आणि दोन्ही किडन्या यशस्वीरित्या काढून गरजू रुग्णांना प्रत्यारोपणासाठी दिल्या आहेत.
वाशी गावातील रहिवासी विजय जैस्वाल (५०) हे साई जनरल स्टोअर्स नावाचे किराणा दुकान चालवतात. जैस्वाल यांची २२ वर्षीय मुलगी माधुरीने १३ जुलै रोजी रात्री राहत्या घरात गळफास घेतला होता.
माधुरीच्या हृदयाचे ठोके बंद पडले
या घटनेची माहिती मिळताच कुटुंबियांनी तिला तातडीने खाली उतरवून कृत्रिम श्वासोच्छ्वास दिला आणि वाशी येथील एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. रुग्णालयात आणले त्यावेळी माधुरीच्या हृदयाचे ठोके बंद पडले होते. मात्र डॉक्टरांनी अथक प्रयत्न करून ३० मिनिटांच्या सीपीआरनंतर तिचे रक्ताभिसरण पुन्हा सुरू केले. Bengaluru Triple Murder : प्रियकर-प्रेयसीने आई-वडील, धाकट्या बहिणीचा जीव घेतला, AI चॅटबॉटचा सल्ला, दागिने-रोकड घेऊन पळाले तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. मात्र, मेंदूला ऑक्सिजन न मिळाल्यामुळे मेंदूला मोठी सूज आली होती. अखेर १४ जुलै रोजी डॉक्टरांनी तिची प्रकृती तपासून ती ‘ब्रेन डेड’ (मेंदू मृत) झाल्याचे घोषित केले. मात्र तिचे शरीर (हृदय व इतर अवयव) व्हेंटिलेटरच्या साहाय्याने जिवंत होते.
मेंदूमृत तरुणीच्या अवयवदानाचा निर्णय
मुलीच्या मृत्यूच्या धक्क्यातून सावरत असतानाच, एमजीएम रुग्णालयातील डॉक्टरांच्या टीमने जैस्वाल कुटुंबियांना अवयवदानाचा पर्याय समजावून सांगितला. आपली मुलगी वाचू शकली नाही, तरी तिच्या अवयवांच्या रूपाने इतरांना जीवन मिळावे, हा उदात्त विचार करून वडील विजय जैस्वाल आणि कुटुंबियांनी अवयवदानाला तात्काळ होकार दिला.
Anish Gawande | ‘हे सरकार अफझल खानाचं आहे,पाठीत खंजीर खुपसतं’
१६ जुलै रोजी सर्व आवश्यक कायदेशीर व वैद्यकीय चाचण्या पूर्ण करून माधुरीला मृत घोषित करण्यात आले आणि १७ जुलै रोजी सकाळी १० वाजता शस्त्रक्रिया करून तिचे अवयव काढण्यात आले. Crime News : तुषारss तुषारss… नवऱ्याला संपवलं, बायको रात्रभर तुरुंगात तळमळत, ओठात बॉयफ्रेण्डचंच नाव, विचित्र मागणी ऐकून पोलीसही चक्रावले
अवयवदानानंतर बॉडी कुटुंबाकडे
माधुरी हिचे हृदय, यकृत (लिव्हर) आणि दोन्ही किडन्या प्रत्यारोपणासाठी सुरक्षितपणे संकलित करण्यात आल्या. अवयवदानाची ही संपूर्ण प्रक्रिया पार पाडल्यानंतर, बॉडी नातेवाइकांच्या स्वाधीन करण्यात आली. या दुःखद घटनेबाबत कुटुंबियांची कोणाविरुद्धही तक्रार किंवा संशय नसल्याचे वाशी पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा