Mumbai News: ‘एन’ वॉर्डपाठोपाठ सर्वाधिक कारवाई ‘पी दक्षिण’ वॉर्डमध्ये (गोरेगाव) झाली असून सहा महिन्यांत येथे चार हजार तीन अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला.
रस्ते आणि पदपथांवर अनधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांमुळे पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो. महापालिका नियमित कारवाई करत असली, तरी कारवाईनंतरही अनधिकृत फेरीवाल्यांची संख्या कमी होत नसल्याने रस्ते आणि पदपथ अतिक्रमणमुक्त कधी होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
Fifa World Cup 2026: महाराष्ट्रातील रेस्टॉरंट पहाटे ४ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी; फुटबॉल वर्ल्डकपसाठी गृहविभागाचा निर्णय, कोणत्या अटी ठेवल्या?
केंद्र सरकारने २०१४ मध्ये फेरीवाला धोरण जाहीर केले असले, तरी त्याची प्रभावी अंमलबजावणी मुंबईत अद्याप झालेली नाही. दरम्यान, उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार १३ विभागांतील २० संवेदनशील ठिकाणी अनधिकृत फेरीवाल्यांवर विशेष कारवाई सुरू करून ही ठिकाणे फेरीवालामुक्त करण्याचा प्रयत्न झाला. यामध्ये घाटकोपर पूर्व-पश्चिम रेल्वे स्थानक परिसराचा समावेश असलेल्या ‘एन’ वॉर्डचाही समावेश आहे. ‘एन’ विभागात सहा महिन्यांत ४ हजार ६७४ फेरीवाल्यांवर कारवाई करून सहा लाख ११ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडून ३३ अनधिकृत गॅस सिलिंडर जप्त करण्यात आले.
मुंबईभरातील कारवाईत महापालिकेने ५५ हजार ८६१ अनधिकृत फेरीवाल्यांवर दंडात्मक कारवाई करून ७५ लाख १५ हजार २६० रुपयांचा दंड वसूल केला. तसेच ६७८ अनधिकृत गॅस सिलिंडर जप्त करण्यात आले.
Uddhav Thackeray Shivsen UBT Protest | ठाकरेंच्या वाघिणीचं खणखणीत भाषण
कारवाई झालेल्या फेरीवाल्यांची संख्या
एन वॉर्ड (घाटकोपर-विद्याविहार) —४,६७४
पी दक्षिण (गोरेगाव) —४,००३
ए (कुलाबा, फोर्ट, नरीमन पॉइंट) —३,८६२
डी (ग्रॅण्ट रोड, मलबार हिल. गिरगाव) —३,२७२
जी दक्षिण (वरळी, प्रभादेवी, लोअर परळ, करी रोड) —३,४०७
आर मध्य (बोरिवली) —३,९३७
एकूण —५५,८६१
