Pune Marathi News : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपूत्र पार्थ पवार यांनी आज-माजी लोकप्रतिनिधींची आढावा बैठक घेतली आहे.
विकासकामे आणि संघटनात्मक बांधणीवर भर
जय पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या महत्त्वपूर्ण बैठकीदरम्यान पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील प्रलंबित नागरी प्रश्न आणि स्थानिक विकासकामांवर विस्तृत चर्चा झाली. जय पवार यांनी प्रत्येक प्रभागातील कामांचा सद्यस्थितीचा अहवाल घेत, नागरिकांच्या नेमक्या अडचणी काय आहेत हे समजून घेण्याचा प्रयत्न केला. पक्षाची संघटनात्मक बांधणी तळागाळापर्यंत मजबूत करण्यासाठी त्यांनी थेट आजी माजी नगरसेवकांशी संवाद साधत आगामी काळातील रणनीतीवर आवश्यक त्या सूचना दिल्या.
Pune News: पुण्यात नव्या बोगद्याने सिंहगड-सातारा रस्ता जोडणार, प्रवासाचा वेळ ५० मिनिटांवरून १० मिनिटांवर येणार
स्थानिक पातळीवरील अस्वस्थता
गेल्या काही महिन्यांपासून पुण्यातील राष्ट्रवादीच्या गोटात तीव्र नाराजी पसरली होती. स्थानिक पातळीवरील आपल्या अडचणी आणि व्यथा नेमक्या कोणाकडे मांडायच्या, याबद्दल नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये स्पष्टता नव्हती. त्यातच, राज्यात जरी भाजपसोबत युती असली, तरी पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये स्वतःचे वर्चस्व गाजवू पाहणाऱ्या भाजपच्या स्थानिक नेत्यांशी कसे जुळवून घ्यायचे, याबाबत पक्षात कमालीचा संभ्रम होता. पक्षाच्या अस्तित्वासाठी स्थानिक पातळीवर लढा द्यायचा की मवाळ भूमिका घ्यायची, यावरून स्थानिक नेतृत्व द्विधा मनःस्थितीत होते.
पार्थ पवारांच्या भूमिकेमुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी?
यापूर्वी खासदार पार्थ पवार हे पुण्यातील राजकीय घडामोडींमध्ये लक्ष घालत होते. मात्र, त्यांच्या काही धरसोडीच्या निर्णयांमुळे स्थानिक राष्ट्रवादीला भाजपच्या धोरणांसोबत फरफटत जावे लागल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली होती. महापालिकेत आधी भाजपच्या निर्णयांना विरोध करायचा आणि नंतर वरिष्ठ पातळीवरून आलेल्या फोनमुळे त्याच निर्णयांना पाठिंबा द्यायचा, या दुटप्पी भूमिकेचा फटका पक्षाला बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. या पार्श्वभूमीवर, खासदार पार्थ पवार किंवा सुनेत्रा पवार यांनी मध्यस्थी करावी अशी मागणी स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून होत असतानाच, जय पवार यांनी थेट पुढाकार घेत ही बैठक बोलावली.
Dharashiv News : भात वाढल्यानंतर चक्क अळ्या, FDAला कळताच शाळेत अधिकारी धडाधड पोहोचले; जि.प.शाळेतील संतापजनक प्रकार
भाजपविरोधात नगरसेवकांचा संताप; जय पवारांचे आश्वासन
या बैठकीत काही आजी माजी नगरसेवकांनी भाजपच्या स्थानिक नेत्यांविरोधात तक्रारींचा पाढाच वाचला. “वरिष्ठ पातळीवर सत्तेत एकत्र असलो, तरी महापालिकेत भाजपचे नेते आपल्याला कवडीचीही किंमत देत नाहीत, उलट राष्ट्रवादीच्या प्रभागांमधील विकासकामांमध्ये जाणीवपूर्वक अडथळे आणले जातात,” असा थेट आरोप लोकप्रतिनिधींनी केला. जेव्हा भाजपला स्वतःचे ठराव मंजूर करून घेण्यासाठी राष्ट्रवादीच्या मतांची गरज असते, तेव्हा ते वरिष्ठांमार्फत दबाव आणून पाठिंबा घेतात, मात्र राष्ट्रवादीला गरज असते तेव्हा सहकार्याची भूमिका घेत नाहीत, असा संताप नगरसेवकांनी व्यक्त केला. यावर जय पवार यांनी सर्वांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेत, यावर लवकरच वरिष्ठ पातळीवर बोलून सकारात्मक आणि ठोस तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे. या बैठकीमुळे पुण्याच्या राजकारणात आता अजितदादांच्या राजकीय वारसाची नवी इनिंग सुरू झाल्याचे मानले जात आहे.
