Pune RTO: ब्रेक, टायर, स्टीअरिंग, दिवे, आपत्कालीन बाहेर पडण्याची व्यवस्था, अग्निशामक यंत्रणा यासह विविध सुरक्षा बाबींची तपासणी करूनच फिटनेस प्रमाणपत्र दिले जाते.
नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होऊन एक महिना झाला आहे. पुण्यात विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या स्कूल व्हॅन व बसची संख्या साडेसात हजार आहे. या सर्व वाहनांनी ‘फिटनेस’ प्रमाणपत्र घेण्याचे आवाहन आरटीओकडून करण्यात आले होते. त्यासाठी विशेष मोहीम राबवत सुट्टीच्या दिवशी शनिवार आणि रविवारी देखील काम सुरू ठेवण्यात आले होते. त्याचा फायदा झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे आतापर्यंत ७,३३९ बसपैकी ६,५४६ स्कूल बसचालकांनी वैध फिटनेस प्रमाणपत्र घेतले आहे.
Maharashtra Politics : केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारासाठी राष्ट्रवादी प्रचंड आशावादी, पार्थ पवार-प्रफुल पटेल दोघंही मंत्रिपदासाठी उत्सुक असल्याची चर्चा
मात्र, अद्यापही ७९३ स्कूल बसकडे हे प्रमाणपत्र नसल्याचे दिसून आले आहे. तर ११३ शालेय व्हॅनपैकी ९४ व्हॅनकडे वैध ‘फिटनेस’ असून १९ व्हॅन ‘फिटनेस’ विना असल्याची नोंद आहे. स्कूलबस नियमावलीनुसार व्यावसायिक स्वरूपात विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या सर्व वाहनांसाठी दर वर्षी ‘फिटनेस’ तपासणी आवश्यक असते.
आता होणार कारवाई…
पुणे आरटीओकडून शालेय वाहनांची तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. वैध ‘फिटनेस नसलेल्या वाहनांवर कारवाईचा इशारा देण्यात आला. पालकांनीही मुलांची वाहतूक करणाऱ्या बस किंवा व्हॅनचे प्रमाणपत्र, परवाना, सुरक्षा नियमांची खात्री करून घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे; तसेच, खासगी वाहनांमधून विद्यार्थी वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे.
Success Story : महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा, बारामतीच्या लेकीची देशात झेप; मुलींमध्ये ऑल इंडिया रँक-1
७३३९ —एकूण स्कूलबसची संख्या
७४५२ —पुण्यात विद्यार्थी वाहतूक करणारी एकूण वाहने
६५४६ —‘फिटनेस’ घेतलेल्या वाहनांची संख्या
सुरक्षित विद्यार्थी वाहतुकीसाठी स्कूल बस आणि व्हॅन यांनी ‘फिटनेस’ची चाचणी करून घेणे बंधनकारक आहे. त्यासाठी शनिवार व रविवारी देखील कामकाज सुरू ठेवण्यात आले होते. वैध प्रमाणपत्र न घेतलेल्या वाहनांना आता कारवाई केली जाणार आहे. –स्वप्नील भोसले, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे
