• Thu. Sep 3rd, 2026

Thane News : दहिहंडी उत्सव म्हंटला की ठाण्याच्या गोविंदा पथकाच नाव सर्वात आधी घेतल जातं. दहिहंडी उत्सव अवघ्या तीन दिवसांवर आलेला असताना या वेळी देखील सलग तीन वेळा नऊ थरांची सलामी देत ठाणे गोविंदा पथकाने आपली प्रथा कायम राखली.

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म.टा.प्रतिनिधी,ठाणे: दहीहंडी उत्सव अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपलेला असताना ठाण्यातील तीन पथकांनी सराव शिबिरात नऊ थर रचण्याची कामगिरी केली. विशेष म्हणजे, वागळे इस्टेट येथील ‘ सीपी तलावचा राजा ’ गोविंदा पथकाने सलग तिसऱ्यांदा ही कामगिरी करताना लालबाग येथील सराव शिबिरात नऊ थरांचा मनोरा उभारला. त्यामुळे ठाण्यातील पथकांचा डंका वाजत असल्याचे दिसून आले.

गोविंदा पथकाने रचले नऊ थर

गोकुळाष्टमीच्या दिवशी उंच थरांची दहीहंडी फोडण्याच्या पूर्वतयारीची रंगीत तालीम म्हणून सराव शिबिर, अर्थात चोर दहीहंडी उभारण्याची परंपरा आहे. गेल्या आठवड्यात ‘सीपी तलावचा राजा’ गोविंदा पथकाने कोपरीच्या अष्टविनायक चौकात दहीहंडी शिबिरात नऊ थर रचले होते.

‘रामनगरचा राजा’ पथकाची देखील नऊ थरांची कामगिरी

तीच कामगिरी त्यांनी मुंबईत कायम ठेवत उमरखाडी येथे झालेल्या सराव शिबिरात दुसऱ्यांदा, तर लालबाग येथे तिसऱ्यांदा नऊ थर रचले. त्यांचे कौतुक करण्यासाठी मनसे ठाणे जिल्हा दहीहंडी उत्सवाचे आयोजक व पक्षाचे नेते अविनाश जाधव यांनी भेट घेतली. दरम्यान, वागळेतील ‘रामनगरचा राजा’ या पथकानेही सराव शिबिरात नऊ थर उभारण्याची कामगिरी केली.

Maharashtra TimesEknath Shinde : आम्हीच खरी शिवसेना आहोत, सुनावणीनंतर एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य

अपघातशून्य थर रचण्याचा सल्ला

‘ठाण्याचा राजा’ गोविंदा पथकाने यंदा सातत्यपूर्ण सराव केला असून, ज्या ठिकाणी पथकाचा सराव होतो, तेथे नऊ थरांचा मनोरा दोन ते तीन वेळा रचला आहे. सार्वजनिक गोकुळाष्टमी उत्सव, खोपट विभाग, घोडबंदरचे मस्ती ग्रुप, धर्मवीरनगरचा राजा या विविध पथकांच्या कामगिरीकडे लक्ष लागले आहे. यंदाही मंडळांची योग्य तयारी झाली असून, अपघातशून्य थर रचण्याचा मानस सार्वजनिक गोकुळाष्टमी उत्सव, खोपट विभाग मंडळाचे सल्लागार समीर पेंढारे यांनी व्यक्त केला.

Maharashtra TimesPimpri Crime: दिव्यांग पत्नीवर पतीचे अमानुष अत्याचार; आक्षेपार्ह Video काढून केले व्हायरल, तडीपार पतीला अटक

पाच एक्के उभारण्याची किमया केली

कळवा येथील खारेगाव-पाखाडी भागात ओम साई गोविंदा पथकाने ठाण्यात प्रथमच सरावादरम्यान पाच एक्के उभारण्याची किमया केली. मुंबईतील माझगाव-ताडवाडी गोविंदा पथक अशी कामगिरी करण्यासाठी यंदा प्रयत्नशील असून, त्यापाठोपाठ ठाण्यातील गोविंदा पथकही तयारी करत आहेत.

कांचन परुळेकर

लेखकाबद्दलकांचन परुळेकरकांचन परुळेकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कन्सलटंट पदावर कार्यरत आहेत. कांचन स्थानिक बातम्या, पायाभूत सुविधा, बांधकाम आणि विकास प्रकल्प यासाठी लिखाण करतात. त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात ही महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमधून झाली. मार्च २०२६ मध्ये महाराष्ट्र टाइम्सच्या व्हिडिओ विभागात त्यांनी इंटर्न म्हणून काम केले. सुरुवातीला त्यांनी युट्यूब, फेसबुक आणि इन्स्टाग्रामसाठी कन्टेंट तयार करताना व्हिडिओ आणि लेख लिहिले आहेत. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, स्थानिक बातम्या आणि क्राइमसह स्पोर्ट्सवर इत्यादी विषयांचे वाचन आणि लेखन करण्याची त्यांना विशेष आवड आहे.

कांचन यांचे संपूर्ण शिक्षण मराठी माध्यमातून झाले असून पत्रकारितेची आवड असल्याने त्यांनी कोकण ते मुंबई असा शैक्षणिक प्रवास केला. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण गावी पूर्ण केले. इकोनॉमिक्स या विषयातून पद्वी घेतली. लिखाणाची आवड, संवाद साधण्याचे कौशल्य आणि पत्रकारितेची आवड समजून घेऊन साठ्ये कॉलेज विलेपार्ले येथे वृत्तपत्रविद्या आणि संवाद या विषयात त्यांनी पद्व्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेतला.

महाविद्यालयीन काळात कला आणि नाटक विषयात विशेष आवड असल्याने त्यांनी अभिनयदेखील केले आहे. काही नाटक त्यांनी लिहिले आहेत. मुंबई विद्यापीठाच्या युथ फेस्टिवलमध्ये त्यांना अभिनयासाठी ब्रॉन्झ आणि सिल्व्हर मेडल देण्यात आले आहेत. कविता आणि लेख लिहिण्याची आवड असल्याने शाळा ,कॉलेज मासिक अंकात त्यांचे लेख देखील प्रसिध्द झाले आहेत.

२०२६ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन सोबत जोडल्या गेल्यानंतर त्यांची पत्रकारितेची आवड अगदी स्पष्ट झाली. बोलण्यातला स्पष्टपणा लिखाणातली पारदर्शकता अधिक नव्याने समजत गेली. तीन महिन्यांच्या इंटर्नशिप नंतर त्या आता कन्सलटंट पदावर म.टा. समुहात सहभागी झाल्या आहेत. पारदर्शकता आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहचवण्याचं काम त्या करत आहेत.… आणखी वाचा