• Thu. Jul 16th, 2026

    Sangali News: सुनेच्या छेडछाडीचा जाब विचारणाऱ्या सासऱ्याला संपवलं; परप्रांतीय मजूर अटकेत, सांगलीतील धक्कादायक घटना!

    Sangali News: सुनेच्या छेडछाडीचा जाब विचारणाऱ्या सासऱ्याला संपवलं; परप्रांतीय मजूर अटकेत, सांगलीतील धक्कादायक घटना!

    Crime News: आरोपी राजू हा गोटखिंडी येथील बाळासाहेब कोळेकर यांच्याकडे शेतमजूर म्हणून काम करत होता.

    सुनेच्या छेडछाडीचा जाब विचारणाऱ्या सासऱ्याचा खून; परप्रांतीय मजूर अटकेत(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    सांगली: सुनेची छेड काढल्याबद्दल जाब विचारणाऱ्या सासऱ्याचा परप्रांतीय शेतमजूराने खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ह घटना वाळवा तालुक्यातील गोटखिंडी इथं घडली असून आरोपी राजू हा परप्रांतीय असून पांडुरंग गोविंद कोकाटे (वय ७३) असं मृत वृद्धाचे नाव आहे. आरोपीने लाकडी दांडक्याने मारहाण करून पांडुरंग कोकाटे यांचा खून केला. संशयित राजूस याला ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलं. ही घटना बुधवार १५ जुलै रोजी सकाळी अकरा वाजनेच्या सुमारास गोटखिंडी गावाशेजारी असलेल्या तोरणाई विहिरीजवळील ओढ्यालगतच्या गोठ्यात घडली. याबाबत मयत पांडुरंग कोकाटे यांच्या पत्नी मंगल पांडुरंग कोकाटे यांनी परप्रांतीय आरोपी राजू याच्या विरुद्ध आष्टा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

    घटनास्थळावरून आणि पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गोठ्यात जनावरांना चारा टाकायला गेलेल्या महिलेची परप्रांतीय शेतमजूर असलेल्या राजू याने छेड काढली. त्यावेळी गोठ्याजवळ असलेले पीडित महिलेचे वृद्ध सासरे पांडुरंग कोकाटे यांनी याबाबत विचारणा करत आरोपी राजू याला जाब विचारला. त्यानंतर वाद विकोपाला गेला आणि संशयिताने लाकडी दांडक्याने वृद्धावर हल्ला केला.

    दरम्यान, सुनेने मदतीसाठी घराकडे धाव घेत आरडाओरडा करत ग्रामस्थांना बोलावले. ग्रामस्थ गोठ्यात आले असता वृद्ध पांडुरंग कोकाटे हे जखमी अवस्थेत पडले होते. आष्टा ग्रामीण रुग्णालयात उपचारापूर्वी ते मयत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

    पांडुरंग कोकाटे यांच्यावर हल्ला केल्यानंतर संशयित घटनास्थळवरून फरार झाला होता. ग्रामस्थांनी त्याचा पाठलाग करून डोंगर परिसरातील बिरोबा मंदिराजवळ त्याला पकडले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले. या धक्कादायक घटनेनंतर घटनास्थळी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. घटनेची माहिती मिळताच सांगलीचे अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारावकर, पोलीस उपअधीक्षक अरुण पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. तसंच सांगली येथील फॉरेन्सिक टीमने घटनास्थळी पाहणी केली.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

    पत्रकारितेतील अनुभव
    अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

    मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

    शैक्षणिक पात्रता
    अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा