• Sun. Jul 12th, 2026

    आषाढी वारीत आरोग्य पथकाची तत्परता; वेळीच ‘सीपीआर’ देत वारकऱ्याचे प्राण वाचविण्याचा यशस्वी प्रयत्न – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Jul 12, 2026
    आषाढी वारीत आरोग्य पथकाची तत्परता; वेळीच ‘सीपीआर’ देत वारकऱ्याचे प्राण वाचविण्याचा यशस्वी प्रयत्न – महासंवाद


    पुणे, दि. १२ : आषाढी वारीदरम्यान एका वारकऱ्याला अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने गंभीर आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली. मात्र, आरोग्य विभागाच्या तत्परतेमुळे संबंधित वारकऱ्याला तातडीने जीवनरक्षक उपचार मिळाले.

    आरोग्यवर्धिनी केंद्र, दिवे येथील कम्युनिटी हेल्थ ऑफिसर तसेच त्यांच्या समर्पित आरोग्य पथकाने प्रसंगावधान राखत तात्काळ ‘सीपीआर’ (Cardio Pulmonary Resuscitation) देऊन प्राथमिक जीवनरक्षक उपचार सुरू केले. त्यानंतर रुग्णाला पुढील उपचारांसाठी त्वरित वैद्यकीय संस्थेत हलविण्यात आले.

    आरोग्य यंत्रणेची सज्जता, कौशल्य आणि सेवाभाव यामुळे आपत्कालीन परिस्थितीत योग्य वेळी उपचार मिळाल्याने वारकऱ्याच्या जीव वाचण्यास मदत झाली. आषाढी वारीत वारकऱ्यांच्या आरोग्य सुरक्षेसाठी कार्यरत असलेल्या आरोग्य पथकांच्या दक्षतेचे हे प्रेरणादायी उदाहरण ठरले आहे.

    या जीवनरक्षक कार्याबद्दल आरोग्यवर्धिनी केंद्र, दिवे येथील कम्युनिटी हेल्थ ऑफिसर तसेच संपूर्ण आरोग्य पथकाचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, त्यांच्या तत्पर, संवेदनशील आणि समर्पित सेवेसाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र हंकारे यांनी दिली आहे.

    ००००

     

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed