Produced by: Siddhesh Kadam|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
Follow
#samruddhimaharamrg #robbery #nashikसमृद्धी महामार्गावर नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील मलढोण आणि दुसंगवाडी शिवारात चॅनेल क्रमांक 538 ते 543 दरम्यान गुरुवारी मध्यरात्री लुटारूंच्या टोळक्याने धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत लाखो रूपयांची लूटमार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.. दीड तास लुटारूंनी महामार्गावर लोखंडी धारदार वस्तू टाकून वाहनांचे टायर फोडत धुमाकूळ घातला.. तीन वाहनांना लुटारूंनी लक्ष्य केल्याची प्राथमिक माहिती असून, वाहन चालक आणि प्रवाशांना मारहाण करत लाखो रुपयांची लुटमार केली गेली आहे..