Nagpur News: नागपूरातील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये नोंदणी कक्षा पासून डॉक्टरांच्या तपासणीपर्यंत जाण्यासाठी रुग्णांना तासंतास प्रतिक्षा करावी लागत आहे.
चार हजार रुग्ण उपचारासाठी येतात
सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये सध्या न्यूरॉलॉजी, नेफ्रॉलॉजी, कार्डिओलॉजी, गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी, सीटीव्हीएस, युरोलॉजी यांसारखे महत्त्वाचे विभाग कार्यरत आहेत. प्रत्येक विभागाची आठवड्यातून दोन दिवस ओपीडी होते. सर्व विभागांमिळून दररोज सुमारे ६००हून अधिक, तर आठवडाभरात जवळपास चार हजार रुग्ण उपचारासाठी येतात. नागपूर शहरासह विदर्भातील विविध जिल्हे आणि मध्य प्रदेशातूनही रुग्ण येथे उपचारासाठी दाखल होतात.
रुग्णालयात पोहोचल्यानंतर वेगळाच मनस्ताप
चांगले उपचार मिळतील, या आशेने शेकडो किलोमीटर अंतरावरून येणाऱ्या रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना मात्र रुग्णालयात पोहोचल्यानंतर वेगळाच मनस्ताप सहन करावा लागत आहे. उपचारासाठी सर्वप्रथम ओपीडी नोंदणी करणे अनिवार्य असते. मात्र, नोंदणी कक्षाची यंत्रणा अपुरी पडत असल्याने रुग्णांची पहिलीच पायरी अडथळ्यांची ठरत आहे.
Bribe Case: जीएसटीचे लाचखोर अधिकारी CBIच्या जाळ्यात; व्यावसायिकाकडे मागितली दीड कोटीची लाच, रायगडमधील मोठी कारवाई
नोंदणीसाठीच रुग्णांना अर्धा ते पाऊण तास
येथे दोन ते तीन काउंटर असले, तरी नवीन आणि जुन्या रुग्णांच्या वर्गीकरणाव्यतिरिक्त विशेष व्यवस्था नाही. गंभीर रुग्ण, महिला, दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र रांग किंवा वेगळा काउंटर नाही. त्यामुळे सर्वांनाच एकाच रांगेत उभे राहावे लागते. नोंदणीसाठीच रुग्णांना अर्धा ते पाऊण तास, तर अनेकदा दोन-दोन तास वेदना सहन करत प्रतीक्षा करावी लागत असल्याच्या तक्रारी आहेत.
ओपीडीसमोर पुन्हा रांग
नोंदणी पूर्ण झाल्यानंतरही रुग्णांचा त्रास संपत नाही. संबंधित ओपीडीसमोर पुन्हा रांग लागते. सकाळी रुग्णालयात पोहोचलेले अनेक रुग्ण दुपारपर्यंत केवळ नोंदणी आणि तपासणीच्या प्रतीक्षेत असतात. आजारामुळे आधीच अशक्त झालेल्या रुग्णांसाठी ही प्रतीक्षा अधिक त्रासदायक ठरत आहे.
Chhatrapati Sambhajinagar:थंड -गरम वातावरणामुळे डास चिलटांचा उपद्रव वाढला ;विषाणूजन्य आजारांचा उद्रेक, साथीच्या आजारांना आमंत्रण
‘रांगेतच अर्धा दिवस जातो’
“माझ्या पत्नीला हृदयाचा त्रास असल्याने कार्डिओलॉजी विभागात वारंवार यावे लागते. तपासणीपूर्वी नावनोंदणी करावी लागते आणि त्यासाठी मोठी रांग असते. नोंदणी झाल्यानंतर ओपीडीसमोर पुन्हा प्रतीक्षा करावी लागते. आजारामुळे पत्नीला आधीचत्रासअसताना इतका वेळ उभे राहणे किंवा बसून वाट पाहणे कठीण जाते. दूरवरून येत असल्याने पुन्हा-पुन्हा नागपुरात येणेही शक्य नसते. रांगेत उभे राहण्यातच अर्धा दिवस जातो. रुग्णसंख्या वाढत असेल, तर प्रशासनाने नोंदणी काउंटर आणि ओपीडीची व्यवस्था वाढवायला हवी,” असे उपचारासाठी आलेल्या एका रुग्णाने सांगितले.
