म.टा. वृत्तसेवा, घोडबंदर: ठाणे- घोडबंदर मार्गावरील गायमुख घाटातील रस्त्याच्या दुरुस्तीचे काम शनिवारी सकाळपासून हाती घेण्यात आले असून ते आज, रविवारी रात्रीपर्यंत सुरू राहणार आहे. या दरम्यान दोन्ही बाजूंनी वाहतूक सुरू राहणार असली, तरी काही मार्गिका बंद ठेवल्या जाणार आहेत. त्यामुळे वाहतूककोंडी निर्माण होण्याची शक्यता असल्याने, हा मार्ग टाळून पर्यायी मार्गाने प्रवास करण्याचे आवाहन काशिमिरा वाहतूक पोलिसांनी केले आहे.
ठाणे-घोडबंदर मार्गावरील गायमुख घाटातील रस्त्यावर मागील काही दिवस झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. आधीच अरुंद असलेल्या या रस्त्यावर खड्ड्यांमुळे वाहतुकीचा वेग मंदावला आहे. खड्डे आणि रस्त्यावरून वाहणाऱ्या पाण्यामुळे दीड ते दोन तासांहून अधिक काळ कोंडीत अडकून पडावे लागत असल्याने वाहनचालक त्रस्त झाले आहेत.
गायमुख घाटातील रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य, ठाणे-घोडबंदर रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामामुळे वाहतूक बंद; पर्यायी मार्ग कोणते?
या पार्श्वभूमीवर, मिरा-भाईंदर महापालिका प्रशासनाने शनिवारी सकाळी ९ वाजल्यापासून रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. हे काम आज, रविवारी रात्री १२ वाजेपर्यंत केले जाईल. यावेळी दोन्ही मार्गिकांवरील वाहतूक सुरू राहणार आहे. मात्र, घोडबंदरहून येणाऱ्या वाहनांना मिरा-भाईंदर चेना येथून विरुद्ध दिशेने मिरा-भाईंदरकडे सोडले जाणार आहे. तर, ठाण्याकडे जाणाऱ्या मार्गिकेवरील वाहनांना, समोरच्या (येणाऱ्या) मार्गिकेवरील विविध टप्प्यांतील वाहतूक थांबवून सोडले जाईल. यावेळी रस्त्यावर प्रचंड वाहतूककोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पर्यायी रस्त्यांचा वापर करण्याचे आवाहन काशिमिरा वाहतूक पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक प्रफुल वाघ यांनी केले आहे.
या मार्गांचा पर्याय
पालघरकडून ठाण्याकडे जाणाऱ्या वाहनांनी शिरसाड फाट्यावरून गणेशपुरी आणि चिंचोटी खरबाव मार्गे जावे.
गुजरातहून येणाऱ्या वाहनांनी मनोर येथून वाडा नाका मार्गे जावे.
ठाण्याहून घोडबंदरच्या दिशेला जाणाऱ्या वाहनांनी वाय जंक्शन येथून सरळ नाशिक मार्गाने माणकोली मार्गे जावे.
अवजड वाहनांना आज मध्यरात्रीपर्यंत प्रवेशबंदी
घोडबंदर मार्गावरील रस्ते दुरुस्तीच्या कामामुळे शनिवारी सायं. ६ वाजल्यापासून रविवार, १२ जुलै रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत जड वाहनांना निर्बंध घालण्यात आले आहेत. वाहतूककोंडी टाळण्यासाठी ठाणे वाहतूक पोलिसांनी अधिसूचना जारी केली आहे. अत्यावश्यक सेवांतील वाहनांना या निर्बंधातून सूट देण्यात आली आहे, अशी माहिती ठाणे वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी स्पष्ट केले.
Kalyan Water Cut: घोटभर पाण्यासाठी कासावीस; कल्याणमध्ये 96 तास पाणीपुरवठा बंद, टँकरचालकांकडून लूट
मुंबई व ठाण्याकडून घोडबंदर रोडकडे जाणाऱ्या सहा चाकी व त्यावरील सर्व जड वाहनांना वाय जंक्शन आणि कापूरबावडी जंक्शन येथे प्रवेशबंदी असेल. या वाहनांना नाशिक रोड, खारेगाव टोलनाका, माणकोली व अंजूरफाटा मार्गे पर्यायी मार्गाचा वापर करावा लागेल.
मुंब्रा-कळवा येथून घोडबंदर रोडकडे जाणाऱ्या जड वाहनांना खारेगाव टोलनाका (गॅमन) येथे प्रवेशबंदी असून त्यांनाही खारेगाव, माणकोली आणि अंजूरफाटा मार्गे वळविण्यात येणार आहे. नाशिकहून घोडबंदर रोडकडेे येणाऱ्या जड वाहनांना माणकोली नाका येथे प्रवेशबंदी राहील. ही वाहने माणकोली पुलाखालून अंजूरफाटा मार्गे जातील.
ऐन पावसाळ्यात हाती घेण्यात आलेल्या दुरुस्तीच्या कामांमुळे वाहतुकीवर काय परिणाम होईल? प्रशासनाने वाहतूककोंडीवर कमी करण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत याबद्दल तुमचं मत कृपया कमेंट बॉक्समध्ये शेअर करा.
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा