• Sun. Jul 12th, 2026

    Tukaram Mundhe: पळा…पळा…तुकाराम मुंढे आले! रस्त्यावर दुधाचा महापूर; धाडीच्या भीतीने शेकडो लिटर दूध थेट रस्त्यावर ओतलं, साताऱ्यातील धक्कादायक प्रकार

    Tukaram Mundhe: पळा…पळा…तुकाराम मुंढे आले! रस्त्यावर दुधाचा महापूर; धाडीच्या भीतीने शेकडो लिटर दूध थेट रस्त्यावर ओतलं, साताऱ्यातील धक्कादायक प्रकार

    Tukaram Mundhe: एवढ्या मोठ्या प्रमाणावर दूध रस्त्यावर ओतून दिल्याने त्या दुधात मोठी भेसळ होती की काय, या चर्चेने आता तालुक्यात जोर धरला आहे.

    एफडीए(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म. टा. वृत्तसेवा, सातारा: माण तालुक्यातील मोही गावात अन्न व औषध प्रशासनाचा (एफडीए) छापा पडणार असल्याच्या केवळ एका अफवेने दूध संकलन करणाऱ्यांची चांगलीच पळापळ झाली. कारवाईच्या आणि दंडाच्या भीतीने घाबरलेल्या दूध संकलन चालकांनी संकलित केलेले शेकडो लिटर दूध थेट रस्त्याच्या कडेला ओतून दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

    गावातील दूध संकलन केंद्रावर रोजच्या प्रमाणे शेतकऱ्यांकडून दूध गोळा करण्यात आले होते. मात्र, दुपारी अचानक ‘तालुक्यात अन्न व औषध प्रशासनाचे पथक दाखल झाले असून, दूध डेअऱ्यांची तपासणी सुरू आहे,’ अशी बातमी वाऱ्यासारखी पसरली. ही माहिती मिळताच काही दूध संकलन चालकांचे धाबे दणाणले.

    Maharashtra TimesDevendra Fadnavis: दिल्लीच्या चर्चेची उडवली खिल्ली! मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात, ‘मी कालच राजधानीत होतो’
    प्रशासकीय पथक आले असून, केंद्रावर येऊन दुधाचे नमुने घेईल आणि त्यात काही निष्पन्न झाल्यास मोठी कारवाई होईल या भीतीने एका गावातील संकलन चालकाने दुधाचे कॅनच्या कॅन थेट रस्त्याच्या कडेला आणि गटारात ओतून रिकामे केले. पांढरे शुभ्र दूध रस्त्यावरून वाहताना पाहून स्थानिक ग्रामस्थही अवाक् झाले. या संकलन केंद्रांची व चालकांची चौकशी व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

    Maharashtra TimesSupriya Sule: ‘राष्ट्रवादी’ला मनसेतच पाठवायचे बाकी राहिलेय! खासदार सुप्रिया सुळे यांची मिश्किल टिप्पणी
    भेसळयुक्त दूधसाठा सांगोल्यात नष्ट
    सोलापूर : ‘जवळा (ता. सांगोला) येथे अन्न व औषध प्रशासन विभागाने मोठी कारवाई करून १५ लाख एक हजार २८० रुपये किमतीचा ३७ हजार ५३२ लिटर भेसळयुक्त दुधसाठा जागेवरच नष्ट केला ; तसेच संबंधित आस्थापनेस त्रुटीची पूर्तता करेपर्यंत व्यवसाय बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत ,’ देण्यात आलेले आहेत, अशी माहिती सहायक आयुक्त (अन्न) साहेबराव देसाई यांनी दिली. बुरुंगेवाडी, जवळा येथील मे. अजिंक्यराणा मिल्क इंडस्ट्रीज या ठिकाणी अचानक छापा टाकला असता तपासणीदरम्यान चार दुधाचे नमुने घेण्यात आले असून, उर्वरित दूध जप्त करण्यात आले.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा