Chhatrapati Sambhajinagar Crime News : लग्नानंतर विवाहितेसोबत धक्कादायक प्रकार घडला आहे. ही घटना छत्रपती संभाजीनगरमधून समोर आली आहे. आरोपीने तिच्या आईलाही धमकी दिल्याचा आरोप असून, या प्रकरणात मुकुंदवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. नेमकं काय घडलं आणि तक्रारीत कोणते आरोप करण्यात आले आहेत?
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर : लग्नाअगोदर मैत्री असल्याचा गैरफायदा घेऊन एका नराधमाने तरुणीचे लग्न झाल्यानंतर तिचे जुने फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्याची धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये उघडकीस आली आहे. एवढेच नव्हे तर विवाहित तरुणीच्या आईला भेटून “तुझ्या मुलीला मला भेटू द्या, नाहीतर जीवाचे बरे-वाईट करून घेईन,” अशी धमकीही या माथेफिरूने दिली आहे. याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून छत्रपती संभाजीनगरमधील मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समाधान बाळासाहेब नाईकवाडे रा. श्रीरामनगर, शिर्डी, जि. अहमदनगर असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. पीडित विवाहिता सध्या छत्रपती संभाजीनगर शहरात आपल्या पती, सासू आणि सासऱ्यांसोबत राहते. लग्नापूर्वी तिची ओळख शिर्डीच्या समाधान नाईकवाडे याच्यासोबत होती. पूर्वपरिचित आणि मैत्री असल्याने त्यांनी काही काळापूर्वी एकत्र फोटो देखील काढले होते. दरम्यान, ११ जून रोजी या तरुणीचा विवाह झाला आणि ती सुखाने सासरी नांदत होती.
Ashadhi Ekadashi Schedule : ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराजांच्या पालख्या पुण्यनगरीत, माऊली यंदाच्या पालखींचं वेळापत्रक पाहिलं का? वाचा सविस्तर
बहिणीच्या फोननंतर उघडकीस आला प्रकार
तरुणी सासरी आल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच आरोपीने त्रास देण्यास सुरुवात केली. ४ जुलै रोजी विवाहितेच्या पतीला त्याच्या बहिणीचा फोन आला. तिने सांगितले की, इंस्टाग्रामवर तुझ्या पत्नीचे एका मुलासोबतचे फोटो पोस्ट करण्यात आले असून ते व्हायरल होत आहेत. हा प्रकार समजताच कुटुंबात एकच खळबळ उडाली.
विवाहितेच्या आईला दिली आत्महत्येची धमकी
फोटो व्हायरल करून आरोपी समाधान एवढ्यावरच थांबला नाही. ८ जुलै रोजी तो थेट विवाहितेच्या आईच्या घरी गेला. तिथे त्याने आईला धमकावत, “मला तुमच्या मुलीला भेटायचे आहे, ती जर मला भेटली नाही तर मी माझ्या जीवाचे काहीतरी बरे-वाईट (आत्महत्या) करून घेईन,” अशी उघड धमकी दिली. आरोपीच्या या सततच्या त्रासाला आणि ब्लॅकमेलिंगला कंटाळून अखेर विवाहितेने मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. पोलिसांनी आरोपी समाधान नाईकवाडे याच्याविरुद्ध रीतसर गुन्हा दाखल केला असून, मुकुंदवाडी पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा