• Tue. Aug 25th, 2026

Nagpur Chlorine Gas Leak: क्लोरिन गळतीने गुदमरले गोधनी! जलशुद्धीकरण केंद्रातून पसरला विषारी वायू; 56 बाधित, 8 जण अतिदक्षता विभागात

म.टा.प्रतिनिधी, नागपूर: गोधनी ग्रामपंचायत परिसरातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जलशुद्धीकरण केंद्रातून क्लोरीन गॅसची गळती झाल्याने सोमवारी पहाटे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. विषारी वायू निवासी भागात पसरल्याने ५६ नागरिकांना श्वसनाचा त्रास, खोकला, डोळ्यांची जळजळ अशी लक्षणे जाणवली. बाधितांना तातडीने विविध रुग्णालयांत दाखल करण्यात आले.

उपचारानंतर ११ जणांना घरी सोडण्यात आले असून, ४५ जणांवर उपचार सुरू आहेत. यापैकी आठ जणांची प्रकृती गंभीर असून, त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

गोधनी येथील जलशुद्धीकरण केंद्रात क्लोरीन गॅसचे ९०० किलो क्षमतेचे दोन सिलिंडर होते. त्यापैकी एका सिलिंडरमधून मध्यरात्रीनंतर गळती सुरू झाली. काही वेळातच क्लोरीन वायू जलशुद्धीकरण केंद्राभोवतीच्या निवासी भागात पसरला. अनेक नागरिक झोपेत असतानाच त्यांना खोकला आणि श्वास घेण्यास त्रास होऊ लागला.

Devendra Fadnavis | कर्जमाफी, महिला आरक्षण ते सुट्टे खाद्यतेलापर्यंत, मंत्रिमंडळात महत्त्वाचे निर्णय

घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन, पोलिस, अग्निशमन दल, आरोग्य विभाग, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आणि एनडीआरएफचे पथक घटनास्थळी दाखल झाले. नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले. आरोग्य विभागाच्या पथकाकडून घराघरांत जाऊन नागरिकांची तपासणी सुरू करण्यात आली.

गळती नियंत्रणात आणण्यासाठी तांत्रिक पथकाच्या देखरेखीखाली गळती होत असलेला सिलिंडर कॉस्टिक सोडामिश्रित पाण्याच्या टाकीत टाकण्यात आला. क्लोरीनचा प्रभाव कमी करण्याची कार्यवाही करण्यात आली. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून हवेच्या गुणवत्तेची नोंद घेतली जात आहे.

पोलिसांनी झोपेतून उठवले
गळतीच्या वेळी परिसरातील अनेक नागरिक झोपेत होते. पोलिसांनी नाकाला रुमाल बांधून स्पीकरद्वारे नागरिकांना घराबाहेर पडण्याच्या सूचना दिल्या. काही ठिकाणी पोलिसांनी घरोघरी जाऊन दरवाजे ठोठावले. ज्येष्ठ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी पोलिसांनी मदत केली. पोलिस व्हॅनमधूनही काही नागरिकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचविण्यात आले.

Rohit Pawar: कॅबिनेट बैठकीच्या वेळेत बदल, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन सत्तेत जाणार? चर्चांचं वादळ उठताच रोहित पवार रोखठोक बोलले!चौकशीची मागणी
जिल्हा परिषद जलजीवन मिशन अंतर्गत सुमारे २५ कोटी रुपयांची ही योजना आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून या योजनेचे काम सुरू असून ती अद्याप नगरपंचायतीकडे हस्तांतरित झालेली नाही. क्लोरिन गळती नेमकी कोणाच्या चुकीमुळे झाली, याची चौकशी करावी आणि बाधितांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्ष कुंदा राऊत यांनी केली. कुंदा राऊत, गोधनी नगरपंचायतचे उपाध्यक्ष अरुण राऊत, बांधकाम सभापती राहुल मनोहर, सभापती राजू महाजन, सागर महाजन आदींनी रुग्णालयात जाऊन बाधितांची भेट घेतली. दरम्यान, प्रशासनाने ५६ बाधितांची माहिती दिली आहे; स्थानिक लोकप्रतिनिधींनी मात्र २०० पेक्षा अधिक नागरिक बाधित झाल्याचा दावा केला आहे.

पशुपक्ष्यांनाही फटका
क्लोरिन गळतीचा परिणाम पशुपक्ष्यांवरही दिसून आला. दोन श्वानांचा मृत्यू झाल्याचे, तर काही चिमण्या मृतावस्थेत आढळल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. परिसरातील झाडेही कोमेजल्याचे गोधनी नगरपंचायतीचे बांधकाम सभापती राहुल मनोहर यांनी सांगितले.

सिलिंडर कॉस्टिक सोडा मिश्रित पाण्यात
गळती नियंत्रणात आणण्यासाठी तांत्रिक पथकाच्या देखरेखीखाली गळती होत असलेला सिलिंडर कॉस्टिक सोडा मिश्रित पाण्याच्या टाकीत टाकण्यात आला. रासायनिक पद्धतीने क्लोरिनचा प्रभाव कमी करण्याची कार्यवाही करण्यात आली. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून परिसरातील हवेच्या गुणवत्तेची नोंद घेतली जात आहे. मनपा आयुक्त डॉ. विपीन इटनकर यांनी सांगितले की, मनपाच्या अग्निशमन विभागाचे दोन पाण्याचे बंब आणि ब्रीदिंग अॅपरेटससह पथक घटनास्थळी दाखल झाले. ओसीडब्ल्यूचे कर्मचारी आणि एनडीआरएफची मदत घेण्यात आली. पहाटे साडेपाचच्या सुमारास गळती कमी झाल्यानंतर सिलिंडर सुरक्षितरीत्या कॉस्टिक सोडा मिश्रित पाण्यात टाकण्यात आला. निवासी उपजिल्हाधिकारी अनुप खांडे यांनी परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगत नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन केले.

Maharashtra TimesDevendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांनीही जेन झींची गर्दी जमवत ताकद दाखवली; राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमावर हल्लाबोल, काँग्रेसवर आरोप करताना काय म्हणाले?सायरन वाजलाच नाही
धोकादायक वायू साठविला जातो, अशा ठिकाणी आपत्कालीन इशारा यंत्रणा असणे अपेक्षित असते. मात्र, गोधनीतील क्लोरिन गळतीनंतर कोणताही सायरन वाजला नाही, असा आरोप गावकऱ्यांनी केला. गळतीनंतर तातडीने सायरन वाजला असता, तर नागरिकांना धोक्याची सूचना मिळून ते वेळीच घराबाहेर पडले असते. परंतु, कोणतीही सूचना न मिळाल्याने अनेक गावकरी अनभिज्ञ राहिले. खोकला, डोळ्यांची जळजळ आणि श्वास घेण्यास त्रास सुरू झाल्यानंतरच लोक घराबाहेर पडू लागले. नेमके काय घडत आहे, हे कळण्यास उशीर झाल्याने त्रास वाढला, असे गावातील राहुल मनोहर यांनी सांगितले.

आयसीयूत असणारे रुग्ण
शालिनी भांडवलकर (वय ६४), नरेंद्र होनवानी (वय ४७), संतोष शिवारे (वय ५०), भारती गंगापूरवार (वय ३५), प्रशांत लक्षणे (वय ३१), नेहा लक्षणे (वय २८), यश खवले (वय २२) आणि नीलेश नागदेवते (६०).

रुग्णालयनिहाय स्थिती
रुग्णालय— दाखल— रुग्ण स्थिती

झिंगाबाई टाकळी— ७— ६ जणांवर ओपीडीत उपचार
मॅक्स रुग्णालय, मानकापूर— १३— ४ आयसीयूत, ९ स्थिर
मेयो रुग्णालय— १७— २ आयसीयूत
ऑलराइट हॉस्पिटल, मानकापूर— ११— ५ जणांना सुट्टी, इतर स्थिर
किंग्जवे हॉस्पिटल— २—दोघे आयसीयूत

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed