सभागृह नेते गणेश बीडकर यांनी राष्ट्रवादीच्या भूमिकेबाबत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना पत्र पाठवल्यानंतर ‘राष्ट्रवादी’चे शहराध्यक्ष सुनील टिंगरे यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून ‘राष्ट्रवादी’च्या नगरसेवकांना समान आणि न्याय्य निधी देण्यासह विविध समित्यांमध्ये योग्य प्रतिनिधित्व देण्याची मागणी केली आहे. त्यामुळे बीडकरांच्या पत्राला टिंगरेंनी मुख्यमंत्र्यांकडे दाद मागत उत्तर दिल्याचे मानले जात आहे.
Rupali Chakankar: रुपाली चाकणकरांच्या तक्रारीनंतर पुण्यात १९ जणांवर गुन्हा दाखल; अंधारे, ठोंबरेंसह अनेक मोठ्या चेहऱ्यांचा समावेशमहायुतीतील घटक पक्ष म्हणून राष्ट्रवादीने नेहमीच सहकार्याची भूमिका घेतली आहे. महापालिका निवडणुकीनंतर राष्ट्रवादी विरोधी पक्षात बसली असली, तरी महायुतीचा धर्म आणि पुण्याच्या विकासाचे हित लक्षात घेऊन पक्षाने सकारात्मक भूमिका घेतल्याचे टिंगरे यांनी पत्रात म्हटले आहे. महापौर आणि उपमहापौर निवडणुकीतही राष्ट्रवादीने सहकार्य केले. त्या वेळी ‘राष्ट्रवादी’च्या नगरसेवकांना निधी; तसेच विविध समित्यांमध्ये योग्य प्रतिनिधित्व देण्याचे आश्वासन गणेश बीडकर यांनी दिले होते, असा दावा त्यांनी केला आहे. मात्र, त्यानंतर स्थायी समितीच्या अर्थसंकल्पीय निधीवाटपात राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना अपेक्षित न्याय मिळाला नसल्याचे टिंगरे यांनी म्हटले आहे.
‘‘राष्ट्रवादी’ची भूमिका व्यक्ती किंवा पक्षाच्या विरोधाची नसून, विकासाच्या मुद्द्यांवर सहकार्याची आहे. महायुतीतील वरिष्ठ नेत्यांबाबत करण्यात आलेल्या कोणत्याही टीका-टिप्पणीचे समर्थन केलेले नाही आणि करणारही नाही,’ असे टिंगरे यांनी स्पष्ट केले आहे. या भूमिकेमुळे नगरसेवक अमोल बालवडकर यांच्या चंद्रकांत पाटील यांच्यावरील आरोपांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने अमोल बालवडकरांना ‘झटका’ दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
Pune Women Police: पुण्यातील दोन महिला पोलीस एकमेकींच्या प्रेमात पडल्या, रविवारी विवाहबद्ध होणार; सुट्टीच्या अर्जात काय सांगितलं?‘नगरसेवकांचा निधी शून्य’
गेल्या आठवड्यात स्थायी समितीतील राष्ट्रवादीचे नगरसेवक अमोल बालवडकर आणि सुहास टिंगरे यांचा निधी शून्य करण्याचा निर्णय घेण्यात आला. आगामी काळात अन्य ‘राष्ट्रवादी’च्या नगरसेवकांच्या निधीबाबतही अशीच भूमिका घेतली जाण्याची चर्चा असल्याचा दावा सुनील टिंगरे यांनी केला आहे. एखाद्या व्यक्तीशी असलेल्या राजकीय मतभेदांचा परिणाम संपूर्ण पक्षाच्या नगरसेवकांवर आणि नागरिकांच्या विकासकामांवर होऊ नये, अशी अपेक्षाही सुनील टिंगरे यांनी व्यक्त केली आहे.
‘सुनेत्रा पवारांच्या सूचनांची अंमलबजावणी नाही’
या परिस्थितीबाबत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पत्राद्वारे आपल्याकडे परिस्थिती निदर्शनास आणून दिली होती. त्यानंतर महापालिका आयुक्तांना आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, अपेक्षित तोडगा निघालेला नसल्याचे टिंगरे यांनी म्हटले आहे. त्यामुळे या सूचनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. पुण्याचा विकास हा पक्षीय राजकारणापेक्षा मोठा असून, महायुतीतील सहकार्याची भावना कायम ठेवण्यासाठी सकारात्मक हस्तक्षेप करावा, अशी अपेक्षाही टिंगरे यांनी व्यक्त केली आहे.
