Gadchiroli Flood: पर्लकोटा नदीवरील जुन्या पुलावरून पाणी वाहत असल्याने भागरागड आलापल्ली मार्गावरील वाहतूक बंद आहे.
भामरागड परिसरात रविवारी रात्रीपासून पावसाचा जोर वाढल्यानंतर पर्लकोटा नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली. नदीवरील नवीन पुलाचे काम अद्याप पूर्ण झालेले नसल्याने सध्या जुन्या पुलावरूनच वाहतूक सुरू होती. मात्र, पुराचे पाणी पुलावर आल्याने प्रशासनाला हा मार्ग बंद करावा लागला. त्यामुळे भामरागडमार्गे होणारी वाहतूक ठप्प झाली आहे.
Manoj Jarange Patil : मराठ्यांनो घराबाहेर पडा, हे शेवटचं आंदोलन, सरकारच्या शिष्टमंडळाच्या भेटीनंतर जरांगे यांचं आवाहनदरम्यान, जिल्ह्यात इतरत्रही पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मागील २४ तासांत कुरखेडा तालुक्यातील कढोली मंडळात ११२.४ मिमी पावसाची नोंद झाली. सिरोंचा तालुक्यातील असरअली मंडळात ८८.६ मिमी, तर अहेरी तालुक्यातील जिमलगट्टा मंडळात ७५.४ मिमी पाऊस झाला. मुसळधार पावसामुळे अनेक लहान-मोठे नदी-नाले दुथडी भरून वाहत असून, ग्रामीण भागातील वाहतुकीवरही परिणाम झाला आहे.
दक्षिण गडचिरोलीतील पावसाचा जोर अद्याप कायम असल्याने नदी-नाल्यांच्या पाणीपातळीत आणखी वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, पुराच्या पाण्यातून जीव धोक्यात घालून प्रवास करू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
Pune Politics: भाजप-राष्ट्रवादीमध्ये आता ‘लेटरवॉर’; बीडकरांच्या पत्रावर सुनील टिंगरेंचे थेट मुख्यमंत्र्यांना पत्रपुरामुळे मृतदेह घेऊन जाणारी रुग्णवाहिका अडकली
पूरस्थितीची गंभीरता आलापल्ली-सिरोंचा मार्गावरही दिसून आली. नंदीगाव येथील नाल्याला अचानक पूर आल्याने मृतदेह घेऊन जाणारी रुग्णवाहिका तसेच अन्य वाहने काही काळ अडकून पडली. जिमलगट्टा येथील मलय्या पंटीवार यांचा हेडरी येथील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. त्यांचा मृतदेह रुग्णवाहिकेतून जिमलगट्टा येथे आणला जात असताना नंदीगावच्या नाल्यावरील पुरामुळे रुग्णवाहिकेचा प्रवास थांबला. त्यामुळे दुःखात असलेल्या कुटुंबीयांना मृतदेहासह मार्गातच थांबावे लागले.
